-
मुंबई : राज्यातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवावर यंदा करोनाचं सावट आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईतील गणेशोत्सवाला बसला आहे. (सर्व छायाचित्रे – प्रदीप दास)
-
गणेशोत्सव हा मुंबईतील एक महत्वाचा सण असून गणेश मूर्ती घडवणारी कलाकार मंडळी या सणाची दरवर्षी वाट पाहत असतात, कारण या काळातच त्यांची चांगली कमाई होते.
-
यंदा करोनाच्या संकटामुळे राज्य शासनानं या दहा दिवसांच्या उत्सवावर कडक निर्बंध लादले आहेत.
-
त्यामुळे मुंबईतील बिगबजेट सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी यंदा हा उत्सव नेहमीसारखा भव्य स्वरुपात साजरा न करता छोट्या गणेश मूर्तीसह साजरा करण्याचे ठरविले आहे.
-
मूर्तिकार संजय वाईकर म्हणाले, मी पेणवरुन रंगकाम न केलेल्या मूर्ती आणल्या त्यानंतर त्यांच्यावर स्वतः रंगकाम करुन त्यांची सजावटही केली. मी मातीची भांडीही विकली मात्र आता सर्वकाही ठप्प झालं आहे. सध्या हा व्यवसायच मंदावला आहे.
-
गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यातील काही कलाकार आता रोजीरोटीसाठी भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
-
मूर्तिकार दिलीप रॉयभा म्हणाले, वर्षातील गणपती, दसरा आणि दिवाळी हे सण आमचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. या काळात वर्षभर आपली गरज भागेल इतकी कमाई आम्ही करतो.
-
यंदा गणेशमूर्ती विक्रीसाठी भाड्याने घेतलेल्या गाळ्यांचं भाडंही निघू शकेल की नाही याबाबत शंका आहे. आता केवळ या उत्सवासाठी महिन्याचाच कालावधी शिल्लक आहे.
-
यापूर्वी नागरिक प्रत्यक्ष गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधीच गणेश मूर्तींचं बुकिंग करीत असत. यंदा केवळ घरगुती पुजेसाठीच्या छोट्या गणेश मूर्तींनाच बाजारात मागणी आहे.
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का