रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. कुंडलिका नदीही धोक्याची पातळी ओलांडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रोहा शहर आणि किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली होता. रात्रभर पावासाची संततधार जोरदार सरी कोसळत होत्या महाबळेश्वर आणि पोलादपूरच्या खोऱ्यात पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे सावित्री नदीने सकाळी सातच्या सुमारास धोका पातळी ओलांडली. नदीची धोका पातळी ६.५० मीटर असून ती सध्या ७.३० मीटरवर वाहत आहे. महाड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरवात द झाली आहे. सुकट गल्ली, बाजार पेठेत पुराचे पाणी शिरले आहे. महाड नगरपालिकेकडून नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड रोडवर बंद आहे. कुंडलिका नदी देखील इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. त्यामुळे रोहा शहर आणि नदीकिनाऱ्यावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी १२.२१ मिनटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात सरासरी ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ररोहा येथे सर्वाधिक १९८ मिलीमीटर, पोलादपूर येथे १९७ , माणगाव, सुधागण आणि म्हसळा येथे १६० मिमीहून अधिक पाऊस पडला आहे. आंबा, पातळगंगा नद्याच्या पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदी इशारा पातळीवर, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच