-
अयोध्येतील भव्यदिव्य अशा राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.
-
दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदी, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला.
-
करोनाचे संकट लक्षात घेता या सोहळ्याला मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. पण इतर नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी घरीच हा सोहळ साजरा केला.
-
खासदार प्रितम मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी घरातच रामाची पूजाअर्चना करत सोहळा अनुभवला.
-
मुंडे भगिनींनी घरातच रामाची प्रतिमा, मूर्ती आणि रामरक्षा स्तोत्राचे पुस्तक ठेवून प्रभू रामाचंद्रांची मनोभावे पुजा केली.
-
त्याचसोबत मुंडे भवनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या शेजारी गुढी उभारून सोहळा साजरा करण्यात आला.
-
प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांना मिठाई भरवून या भूमिपूजनाचा आनंद साजरा केला.
-
"वयाच्या आठव्या वर्षापासून घर परिवारात 'जय श्रीराम' हा जयघोष ऐकत आले. मुंडे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने असंख्य लोकांना कारसेवक म्हणून गेलेले पाहिले, सन्माननिय अडवाणीजींची रथयात्रा पाहिली. त्यासर्वांचे प्रयत्न पूर्णत्वास घेऊन जाणारा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा हा सुवर्णदिन निश्चितच अभिमानाचा आहे", अशा भावना खासदार प्रितम मुंडे यांनी व्यक्त केल्या.
-
भारताची नागरिक म्हणून या ऐतिहासिक घटनेचं प्रितम मुंडे यांनी स्वागतदेखील केले.
-
तर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करत 'जय श्रीराम !!' असं कॅप्शन दिलं.
![Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes, Quotes in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-18-at-11.58.10.jpeg?w=300&h=200&crop=1)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज