-
अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत चंद्रपूर शहरात बांधण्यात आलेल्या नवीन पाण्याच्या टाक्या नव्या रंगा-ढंगात सजल्या आहेत. (सर्व छायाचित्रे – रवींद्र जुनारकर)
-
शहराला पाणी पुरविणाऱ्या या टाक्यांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पारंपारिक पद्धतीने रंग न देता कल्पकतेने रंगवून चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतीक महत्व जपण्याचा प्रयत्न केला आहे.
-
चंद्रपूर जिल्ह्याची पुढील ५० वर्षांची पाणीपुरवठा मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकार, राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाच्या पुढाकारातून अमृत अभियानाअंतर्गत स्वयंचलित पाणीपुरवठा योजना शहरात उभारण्यात येत आहे.
-
संपूर्ण शहरात नवीन पाईपलाईनचे जाळे उभारण्यात येत असून विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.
-
या टाक्यांना पारंपारिक पद्धतीने रंग न देता कल्पकतेने रंगवून मनपाने चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतीक महत्व जपण्याचा प्रयत्न केला आहे.
-
अतिशय सुंदररीत्या रंगविले जात असल्याने दूरवरूनही या टाक्या अगदी ठळक उठून दिसतात.
-
इमारत बांधताना चांगले साहित्य, बांधकाम, मार्गदर्शन, देखरेख मिळाल्यास उच्च प्रतीची गुणवत्ता मिळते, या गुणवत्तेबरोबरच योग्य रंगाची, चित्रांची साथ मिळाल्यास ती इमारत नयनरम्य होते. हीच बाब प्रकर्षाने लक्षात घेऊन मनपातर्फे या नवीन टाक्या पारंपारीक पद्धतीने न रंगवीता ‘हटके‘ रंगविण्यात आल्या आहेत.
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार