-
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने, रस्त्याच्या कडेला वास्तव्यास असलेले मुर्तीकार त्यांनी तयार केलेल्या गणेश मुर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. (फोटो – गणेश शिर्सेकर)
-
यंदाच्या गणेशोत्सवावर करोना महामारीचं सावट आहे.
-
तरी देखील गणेश भक्तांच्या उत्साहात कुठलीही कमतरता नसणार याचा या मुर्तीकारांना विश्वास असल्याने, अधिक सुबक गणेश मुर्ती ते घडवत आहेत.
-
घरगुती गणपतीसाठी देखील अत्यंस सुरेख व सुबक अशा गणेश मुर्ती तयार केल्या जात आहेत.
-
अत्यंत मन लावून गणेश मुर्ती घडवताना, मुर्तीकार दिसत आहेत.
-
गणपती हा विघ्नहर्ता देव म्हणून ओळखला जातो. अनेक मूर्तीकार सध्या आर्थिक संकटात आहेत. काही कलाकार या संकटातूनही मार्ग काढत मूर्ती तयार करत आहेत.
-
यंदा करोनामुळे गणेश मूर्त्यांची मागणी कमी आहे, सण साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध आणि अटी घालून दिल्या आहेत.
-
संपूर्ण राज्यात करोनामुळे निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती यामुळे यंदाचं वर्ष हे मूर्तीकारांसाठी खरंच खडतर आहे.
-
तरीही मूर्तीकार सर्वकाही ठीक होईल या आशेने आपलं काम करत आहेत.
-
गणेश मंडळांसाठी मोठ्या आकारच्या गणेश मुर्ती देखील तयार झालेल्या असून, आता केवळ गणेश भक्तांची या मुर्तींना प्रतीक्षा असल्याचे दिसत आहे.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…