-
लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता महिलांनी गौराई पुजनाच्या तयारीला सुरूवात केली आहे. ( सर्व फोटो : पवन खेंगरे )
-
घरोघरी गौराईचे थाटामाटात आगमन करण्यासाठी महिलांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
-
पुण्यात दरवर्षी तुळशीबाग, मंडई परिसरात गौरीचे मुखवटे, साडी, तयार हात, दागिने आणि इतर साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत असते.
-
पण यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी कमी असल्याचं दिसत आहे.
-
गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.
-
प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते.
-
गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
-
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते
-
गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात.
-
ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते

Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार