-
मुंबई : करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहं अद्याप उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, ती उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)
-
चित्रपटगृहं उघडण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे (एसओपी) पालन करुन कशा प्रकारे प्रत्येक खुर्ची निर्जंतुक केली जाते याचे प्रात्यक्षिक मालाडमध्ये दाखवण्यात आले.
-
या प्रात्यक्षिकांनुसार, कामगार पीपीई कीट घालून सिनेमा हॉलमधील खुर्च्या सॅनिटाईज करीत होते.
-
राज्यात लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या जवळपास सर्वच बाबी आता पूर्ववत झाल्याने चित्रपटगृहं देखील खुली होतील या प्रतिक्षेत मल्टिप्लेक्स आहेत.
-
गर्दी टाळण्यासाठी चित्रपटगृहं बंद असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रत्यक्ष चित्रिकरणाला परवानगी देण्यात आल्याने नियम व अटींचे पालन करुन सर्वत्र चित्रीकरणं सुरु झाली आहेत.
-
चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहं बंद असली तरी अनेक निर्मात्यांना आता ओटीपीचा प्लॅटफॉर्म खुला झाल्याने अनेक सिनेमे इथेच प्रदर्शित होत आहेत.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल