IPL 2020 : प्रतिभा असतानाही भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सूर्यकुमार यादव याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. आयपीएलच्या १३ हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना सूर्यकुमारने चमकदार कामगिरी केल्यानंतरही त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. मुंबईच्या विजयात सूर्यकुमारचं योगदान मोलाचं ठरलं आहे. क्रिकेटप्रमाणेच सूर्यकुमारची पर्सनल लाइफही मनोरंजक आहे. १९ वर्षीय मुलीचं नृत्य पाहून सूर्यकुमार यादव प्रेमात पडला होता. त्यावेळी तो फक्त २२ वर्षाचा होता. सूर्यकुमारने अखेरीस त्याच मुलीसोबत (देविशा शेट्टी) लग्न केलं. पाहूयात सूर्यकुमारची प्रेमकहाणी…. सूर्यकुमार मुळचा वाराणसीचा आहे. पण वडील अशोक कुमार यादव भाभा अणू संशोधन केंद्रात कार्यरत आहेत. २००० मध्ये अशोक यादव मुंबईत शिफ्ट झाले. सूर्यकुमार यादवचं पूर्ण शिक्षण मुंबईत झालं आहे. २०१२ मध्ये सूर्यकुमार पहिल्यांदाच देविशाला भेटला होता. दोघेही मुंबईतील पोतदार कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. सूर्यकुमार बीकॉमच्या पहिल्या वर्षाला होता तर देविशा नुकतीच कॉलेजमध्ये पोहचली होती. एका पार्टीदरम्यान सूर्यकुमार आणि देविशा यांची नजरानजर झाली होती. यावेळी सूर्यकुमार देविशाचा डान्स पाहून फिदा झाला होता. सूर्यकुमारच्या फलंदाजीची देविशा पहिल्यापासूनच चाहती आहे. यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. पाच वर्षांपर्यंत दोघे रिलेशनमध्ये होते. अखेर २०१६ मध्ये देविशा आणि सूर्यकुमार यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. देविशा साउथ इंडियन आहे. दोघांचं लग्न दाक्षिणात्य पद्धतीनं झालं. देविशा सध्या नृत्य शिक्षिका आहे. प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवने वरातीसाठी २८ लाख रुपयांची खरेदी केली होती. त्यानंतर त्या कारवर १० लाख रुपयांचा खर्च करुन देविशाच्या आवडीचा पिवळा रंग दिला होता. त्याशिवाय देविशाला एक कोटी २५ लाख रुपयांची डायमंड रिंग भेट दिली आहे. २०११ पासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये खेळतोय. सर्वातआधी तो मुंबईच्या संघाकडून खेलत होता. त्यानंतर २०१३ मध्ये त्याला कोलकाता संघानं विकत घेतलं होतं. २०१८ मध्ये पुन्हा एकदा मुंबईनं सूर्यकुमार यादवसोबत करार केला. या वर्षात सूर्यकुमारने ३६ च्या सरासरीनं ५१२ धावा काढल्या होत्या. यूएईत सुरु असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामातही सूर्यकुमार तळपला आहे. आतापर्यंत ४० च्या सरासरीनं धावा काढल्या आहेत. (सर्व छायाचित्रे – सूर्यकुमार आणि देविशा यांच्या इन्स्टाग्रामवरुन घेतली आहेत.)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ