-
IPL 2020ची धूम सध्या युएईमध्ये सुरू आहे. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाचे खेळाडू आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश करत आहेत. त्यातच भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलही आपल्या फिरकीची जादू दाखवून चाहत्यांना आनंदित करताना दिसत आहे. IPL सुरू होण्याआधी त्याचा यू-ट्युबर धनश्री वर्माबरोबर साखरपुडा पार पडला होता. या स्पर्धेनंतर लवकरच त्यांचं लग्नही होणार आहे. याचदरम्यान, सध्या धनश्री आपल्या जोडीदाराला चीअर करण्यासाठी दुबईत पोहोचली आहे. चाहते धनश्रीच्या स्माइलवर फिदा झाले आहेत.
-
आरसीबीच्या प्रत्येक सामन्यावेळी स्टेडिएममध्ये संघाला चिअर्स करताना धनश्री दिसते.
चहलने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करून ‘माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य संध्याकाळ’ असं छानसं कॅप्शन दिलं आहे. तर ‘आयुष्यातील काही गोष्टी या सूर्यास्ताच्या रंगाप्रमाणेच सुंदर असतात’, असं कॅप्शन देत धनश्रीने तो फोटो पोस्ट केला आहे. -
-
युजवेंद्र चहलचा ऑगस्ट महिन्यात यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा झाला.
-
नंतर धनश्री आपल्या कामात व्यस्त होती आणि चहल IPLसाठी युएईला रवाना झाला.
धनश्री ही डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून काम करते. धनश्रीची स्वतःची डान्स कंपनी आहे. याव्यतिरीक्त धनश्रीचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनल आहे. 1.5 million subscribers सबस्क्राईबर्स असलेली धनश्री ही बॉलिवूड डान्स नंबर आणि हिप हॉप गाण्यांवरही नाचते. -
यूएईत पोहचल्यामुळे धनश्री सध्या चर्चेत आहे. तिच्या स्माईलची सोशल मीडियावर चर्चा असते.
(फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ