-
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून सध्या त्यांना अलिबागमध्ये कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. (सर्व फोटो – संग्रहित)
-
दरम्यान अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या गृह विभागाकडून ४० पोलिसांची टीम तयार करण्यात आली होती.
-
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोकण रेंजचे पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वात ही टीम तयार करण्यात आली.
-
अन्वय नाईक प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची परवानगी मिळाल्यानंतर 'ऑपरेशन अर्णब'ची तयारी सुरु झाली होती. यानंतर मुंबई आणि रायगडमधील ४० पोलिसांची टीम तयार करण्यात आली.
-
संजय मोहिते यांनी अर्णब गोस्वामींना अटक करण्यासंबंधीची योजना तयार केली.
-
या योजनेची अमलबजावणी करण्याची जबाबदारी एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर देण्यात आली. (Photo: PTI)
-
"संजय मोहिते यांच्या नेतृत्वातील टीमसाठी हे एक आव्हानात्मक काम होतं. आम्ही अत्यंत काळजीपूर्वक कारवाई केली. वारंवार चिथावणी देण्याचं काम होत असतानाही प्रत्येत सदस्याने कायद्याप्रमाणे कारवाई केली," अशी माहिती वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.
-
प्राथमिक तपासानंतर अर्णब गोस्वामी आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात सहभागी असल्याचं निष्पन्न झालं अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
-
"अर्णब गोस्वामी राहत असलेल्या इमारतीला अनेक चकरा मारण्यात आल्या. हे एक सिक्रेट ऑपरेशन होतं. अटक टाळण्यासाठी अर्णब गोस्वामी शहराबाहेर जाण्याची शक्यता होती," असं त्यांनी सांगितलं आहे.
-
अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली.
-
"ही एक नियोजित कारवाई होती. प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेण्यात आली होती. कोण दरवाजा ठोठावणार, कोण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलणार आणि विरोध झाल्यास काय कारवाई होईल हेदेखील ठरलं होतं. अर्णब यांनी विरोध केला. पण जेव्हा सचिन वझे यांनी त्यांना सहकार्य न केल्यास काय कायदेशीर कारवाई होईल हे समजावल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली," अशी माहिती त्यांनी दिली आहे.
-
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, फडणवीस सरकारने केस बंद करण्यासाठी सर्व प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे.
-
"मी जेव्हा मानसी नाईक आणि त्यांच्या मुलीची बाजू ऐकली तेव्हा मला धक्काच बसला. हे महाराष्ट्रात झालं आहे यावर माझा विश्वासच बसला नाही. आम्ही या केसला शेवपर्यंत नेऊ," असं ते म्हणाले आहेत.
-
अनिल देशमुख यांनी भाजपावर टीका करताना सुशांत सिंह प्रकरणात कोणताही पुरावा नसताना राजकारण करण्यात आलं, मात्र येथे सुसाईड नोट असतानाही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. नाईक कुटुंबाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.
-
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. (संग्रहित – Gettyimage)

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार