-
IPL 2020 FINALमध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतरही रोहित मात्र काहीसा नाराज आहे. (सर्व फोटो- IPL.com)
-
फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते.
-
या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने धमाकेदार अर्धशतक ठोकलं आणि मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला.
-
मुंबईच्या संघाचं हे पाचवं IPL विजेतेपद ठरलं. स्पर्धेचा किताब पाच वेळा जिंकणारा रोहित पहिलाच कर्णधार ठरला.
-
रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक कऱण्यात येत आहे. पण असे असले तरी रोहित शर्मा मात्र एका गोष्टीमुळे नाराज आहे.
-
सामन्यानंतर रोहित शर्माने समालोचकांशी संवाद साधत स्पर्धेतील प्रवासाबाबत सांगितलं. त्यावेळी त्याने स्वत:च्या नाराजीचं कारण सांगितलं.
-
"संपूर्ण स्पर्धेत आणि सामन्यात आम्ही नक्कीच वरचढ होतो. अंतिम सामन्यातदेखील हे दिसून आलं."
-
"संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीच, पण करोनाकाळात अशी स्पर्धा भरवण्यासाठी पड्यदामागील कर्मचाऱ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली."
-
"मुंबईने विजेतेपद मिळवलं यात सूर्यकुमार, इशान, पोलार्ड, पांड्या बंधू.. साऱ्यांनीच अप्रतिम कामगिरी करून दाखवली, पण…"
-
"पण आम्ही आमच्या चाहत्यांना खूप मिस केलं. दुर्दैवाने चाहते सामना पाहायला येऊ शकले नाहीत. पण त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा होता. चाहतेच स्पर्धेला खास स्वरूप देता. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळायला मिळालं नाही याची खंत आहे", अशा शब्दात रोहितने प्रेमळ नाराजी व्यक्त केली.
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल