-
‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज(गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
-
मंत्रोच्चारासह विधीवतरित्या हा भूमिपूजन सोहळा पार पडला.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती होती.
-
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या उभारणीसाठी पूजा करण्यात आली.
-
नवीन संसद भवनासाठी ९७१ कोटींच्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
-
टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे नवीन संसद भवनाच्या उभारणीचं कंत्राट देण्यात आले आहे. नवीन संसद भवनाची इमारत चार मजली असणार आहे.
-
या भूमिपूजन सोहळ्यासाठी मान्यवरांसह सर्व धर्मांच्या गुरूंची देखील उपस्थिती होती.
-
नव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर भारताचं मंदिर असेल. यामध्ये भारतातील विविधतेचं दर्शन घडेल, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले होते.
-
भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींनी नियोजित नवीन संसद भवनाच्या कोनशिलेचे अनावरण केले.
-
या नियोजित संसद भवनात ९०० ते १२०० खासदारांची बैठक व्यवस्था असून हा सुमारे ९७१ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
-
संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत १७,००० स्केअर फूट मोठी असेल. एकूण ६४,५०० स्केअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे.
-
एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने या इमारतीचे डिझाईन बनवले आहे,
-
७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु केले जाणार आहे.
-
विविध धर्मांच्या गुरूंनी या नवीन संसद भवनाच्या उभारणीसाठी प्रार्थना म्हणून आशीर्वाद दिले.
-
भूमिजून सोहळ्याप्रसंगी करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन केले गेल्याचे दिसून आले.
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”