भाजपाचे स्टार प्रवक्ते संबित पात्रा यांचा १३ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. देशातील आघाडीच्या प्रवक्त्यांमध्ये संबित पात्रा यांचं नाव घेतलं जातं. संबित पात्रा हे नेहमीच भाजपाची बाजू भक्कमपणे मांडताना वृत्तवाहिन्यावर दिसतात. जाणून घेऊयात संबित पात्रा यांच्याविषयी ….. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रमाणपत्रानुसार संबित पात्रा यांच्याकडे ७२ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रमाणपत्रानुसार संबित पात्रा यांच्याकडे एक लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम होती. तर बँकमध्ये १९ लाख ४२ हजार रुपये आहेत. संबित पात्रा यांच्याकडे कार अथवा कोणतेही वाहन नाही. गाजियाबादमध्ये संबित पात्रा यांचं घर आहे. त्याची किंमत ४५ लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं. १९९७ मध्ये संबित पात्रा यांनी व्हीएसएस मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर २००२ मध्ये उत्कल विद्यापीठ भुनेश्वर येथून एम.एस सर्जरीचं शिक्षण घेतलं. संबित पात्रा २००२ मध्ये युपीएससीची परीक्षा उतीर्ण झाले. त्यानंतर दिल्ली येथील हिंदू राव हॉस्पिटलमध्ये त्यांनी मेडिकल आधिकारी म्हणून काम पाहिलं. समाजसेवा आणि राजकीय कारणामुळे संबित पात्रा यांनी मेडिकल आधिकारी पदाचा राजीनामा दिला. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा याआधी दिल्ली भाजपाचे प्रवक्ता होते. २०१२ मध्ये संबित पात्रा यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना पराभवचा झटका बसला होता. काँग्रेसच्या हर्ष शर्मा यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. -
२०१९ लकसभा निवडणुकीत असलेल्या मोदी लाटेतही संबित पात्रा यांचा पराभव झाला. त्यांचा फक्त ११ हजार ७१४ मतांनी पराभव झाला होता.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…