१९ जानेवारी रोजी मकर राशीतील गुरू अस्तंगत होत आहे, त्याचबरोबर शनीही अस्त आहे. स्वत:ला योग्य वाटतील अशाच गोष्टींचा निर्णय घ्या. गोड बोलून कार्यभार उरकून घेणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. नोकरीमध्ये अनेक जटिल प्रश्न निर्माण झाले तरी, गाडी रुळावर यायला वेळ लागणार नाही. नोकरदार व्यक्तींनी तडजोडी स्वीकारा. मागील चुका पुन्हा करू नका. व्यवसायाच्या ठिकाणी नको तिथे अनावश्यक प्रतिक्रिया देणे टाळा. व्यावहारिक राहणे उत्तम. आपल्या कामाची घडी नीट बसवता येईल याकडे लक्ष द्या. फार मोठ्या र्आिथक अपेक्षा नसल्या तरी नित्यक्रम चालवण्याइतकी आवक येत राहील. नवे कोणतेही धाडस सध्या घाईने करू नका. राजकीय क्षेत्रात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे विचार आत्मसात करा. स्वत:च्या तब्येतीच्या बाबतीत सतर्कता बाळगा. >> शुभ दिनांक : १७, २३ >> महिलांसाठी : अति भावनिक विचार करणे टाळा. नवमस्थानातील गुरू १९ जानेवारीला अस्तंगत होत आहे, त्याचबरोबर शनी हा ग्रहसुद्धा अस्त आहे. प्रश्न वाढवण्यापेक्षा कसे सुटू लागतील याचा विचार करा. नोकरदार व्यक्तींनी स्वत:च्या भल्यासाठी उचललेले पाऊल अनुकूल ठरेल. प्राधान्यक्रम ठरवून नियोजन करा. व्यवसायात मनासारख्या गोष्टी घडत असल्याने अजून काही नवीन योजनांसाठी प्रयत्न वाढतील. गुंतवणूकीतून योग्य पर्याय मिळेल. र्आिथकदृष्ट्या प्रगतीचा आलेख उंचावता येईल. सामाजिक शक्तिकेंद्रशी जवळीक साधता येईल. मुलांचे अडलेले प्रश्न मार्गी लावताना पाहून समाधानाचे वारे वाहतील. वैवाहिक जीवनात होणारे मतभेद समजुतीने दूर करा. कौटुंबिक जीवनातील सूर जुळवण्याचे प्रयत्न करा. शारीरिकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व दिल्यास प्रकृती उत्तम राहील. >>शुभ दिनांक : १८, १९ >> महिलांसाठी : कष्टाचे चीज होईल. -
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण सप्ताहात होत आहे. १९ जानेवारी रोजी गुरू अस्तंगत होत आहे. तो तुमच्या अष्टमस्थानात असणार आहे. त्याचबरोबर शनीही अस्तंगत आहे. फार मोठ्या अपेक्षा पूर्ण होतील असे नाही, तर अडलेली कामे तरी पूर्ण होतील. नोकरीमध्ये महत्त्वाच्या कामात अपेक्षित प्रगती होईल. हरवलेले जुने प्रकल्प मार्गी लागतील. अनेक बाबतीतला अनुभव चांगला असेल. पारंपरिक व्यवसायातील आवड निर्माण होईल. अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. व्यवसायात येणाऱ्या संधीचा सकारात्मक विचार करा. र्आिथकदृष्ट्या सफलतेचे आकडे पाहू शकाल. सामाजिक क्षेत्रातील खटाटोप कमी होईल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. घरातील सदस्याकडून धीर मिळेल. >> शुभ दिनांक : १७, २१ >> महिलांसाठी : सकारात्मक विचार वाढतील.
-
मकर राशीतला गुरू सप्तमस्थानात असून तो अस्तंगत होत आहे. शनीसुद्धा अस्तंगत आहे. सुरुवातीस वाटणारा नकारात्मक कल बदलण्याचा प्रयत्न करा व ग्रहांची अनुकूलता वाढवा. नोकरीमध्ये महत्त्वाच्या व्यवहारातील दप्तर स्वत:कडे जपून ठेवा. कोणाच्याही मैफलीत सहभाग घेऊ नका. वरिष्ठांचा सल्ला माना. व्यवसायात पुरेशी सतर्कता दाखवल्यास व्यवसायाचे स्वरूप बदलेल. नव्या ओळखीवर विश्वास टाळा. फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. कोणतीही शिस्त न मोडता अडथळे पार कराल. कष्टाचे फळ मिळेल. पैशाचे गणित सुटू लागेल. मित्रपरिवारास सध्या तरी लांब ठेवा. राजकीय क्षेत्रात बोलण्याचा ताळतंत्र सोडू नका. घरगुती वातावरणातील गैरसमजाचे वादळ कमी करा. शारीरिकदृष्ट्या प्रकृती सक्षम राहील.>> शुभ दिनांक : १८,२० >> महिलांसाठी : मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांचा फार विचार करू नका.
-
मकर राशीतील गुरू षष्ठस्थानात असून, तो १९ जानेवारीला अस्तंगत होत आहे. मकर राशीतील शनीसुद्धा अस्तंगत आहे. सकारात्मक गोष्टींचा विचार केल्यास अडचणी कमी होतील. नोकरीमध्ये येणारी काहीशी सुलभता यातून प्रगती साधू शकाल. स्वत:चा अनुभव आणि अभ्यास या जोरावर सतर्क राहात निर्णय घ्या. प्रत्येक वेळी कोणाची तरी मदत मिळेल अशा भ्रमात राहू नका. कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. व्यवसायात सध्या वेगळी वाट घेणे योग्य ठरणार आहे. कला, साहित्य, कायदा इत्यादी क्षेत्रांत असणाऱ्यांना आपली प्रतिमा उंचावण्यास यश मिळेल. मात्र नको तिकडे वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. र्आिथक घोडदौड चालू राहील. राजकीय क्षेत्रात अति थट्टा कोणाची करू नका. शारीरिकदृष्ट्या मर्यादा लक्षात घ्या. >> शुभ दिनांक : २१, २२ >> महिलांसाठी : शांतता आणि समाधानाचे मार्ग शोधा.
-
चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानाकडून अष्टमस्थानाकडे होत आहे. मकर राशीतील गुरू तुमच्या पंचम स्थानात असून १९ जानेवारी रोजी तो अस्तंगत होत आहे. शनी पंचमात असून तोही अस्तंगत आहे. आपली पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. तिऱ्हाईत व्यक्तींच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. नोकरीमध्ये अवाजवी शब्द कोणाला देत बसू नका. स्वत:चा आत्मविश्वास जागा ठेवा. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी नियमबाह्य व्यवहार टाळावेत. व्यवसायात त्याच त्याच चुका पुन्हा करू नका. व्यापार-उद्योगात नव्या खर्चाच्या आकड्यांमध्ये साशंकतेने पाहा. आर्थिकदृष्ट्या बचतीकडे लक्ष द्या. राजकीय क्षेत्रात सध्या मन लागणार नाही. प्रकृतीचे स्वास्थ्य सांभाळा. >> शुभ दिनांक : १८, २० >> महिलांसाठी : बोलण्यावरचा ताबा सोडू नका.
-
चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानाकडून अष्टमस्थानाकडे होत आहे. गुरू १९ जानेवारी रोजी अस्तंगत होत आहे. मानसिकदृष्ट्या चलबिचलता कमी करा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. नोकरदार व्यक्तींनी निराशेचे विचार झटकून कामाला लागावे. नवे आव्हान लगेच स्वीकारू नका. प्रलंबित प्रकरणांना अनुकूल वळण देता येईल. व्यवसायासाठी लागणारे भांडवल मोठ्या स्वरूपात गुंतवू नका. व्यावसायिकदृष्ट्या कोणताही व्यवहार करताना इतरांवर अवलंबून राहू नका. फायद्याचे प्रमाण वाढले नाही तरी चालेल, पण तोटा होणार नाही याची दक्षता घ्या. उधार वसुलीसाठी थोडा धीर धरा. राजकीय क्षेत्रातील चर्चासत्र वेळीच थांबवा. वैवाहिक जोडीदाराशी प्रामाणिक राहा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा. >> शुभ दिनांक : १७, २१ >> महिलांसाठी : कामाचे व्यवस्थापन नीट करा.
-
गुरू महाराज १९ जानेवारी रोजी अस्तंगत होत आहेत. त्याचबरोबर शनीपण तृतीय स्थानात अस्तंगत आहे. स्वत:चेच म्हणणे खरे असल्याचा अट्टहास करू नका. कोणालाही न दुखावता वाटचाल केल्यास कामे पूर्णत्वाला जातील. नोकरीमध्ये पत्रव्यवहारातून अनुकूलता खेचून आणता येईल. ज्येष्ठांच्या बदललेल्या अपेक्षांकडे लक्ष द्या. व्यवसायामध्ये शक्यतो लेखी स्वरूपात नोंदी ठेवा. भागीदारी व्यवसायाला महत्त्व देण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसायाला महत्त्व द्या. आयात-निर्यात व्यापारात अनाठायी धाडस दाखवू नका. बँक प्रकरणे योग्य पद्धतीने हाताळल्यास अपेक्षित असे निर्णय घेता येतील. थोरामोठ्यांच्या ओळखीचा उपयोग होईल. मित्रपरिवाराचे सहकार्य उत्तम मिळेल. कौटुंबिकदृष्ट्या वैचारिक मतभेद टाळा. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही चालढकल करू नका.>> शुभ दिनांक : १८, १९ >> महिलांसाठी : अडचणीतून नव्या संधी शोधता येतील
-
धनस्थानातील गुरू हा १९ जानेवारी रोजी अस्तंगत होत आहे, त्या ठिकाणी शनीसुद्धा अस्तंगत आहे. नेहमीप्रमाणे होणारी द्विधा अवस्था कुठे तरी थांबवण्याचा प्रयत्न करा. ठरवलेले कामकाज बदलू नका. आगामी काळाचे संकेत अनुकूल मिळतील. नोकरीमध्ये विरोधकांचा आवाज आपोआप कमी होत राहील. हितशत्रूंना परस्पर उत्तरे मिळत राहतील. व्यवसायामध्ये शक्यतो सर्व हिशोब लेखी ठेवा. समोर येणारे व्यापाराचे नवे क्षितिज उत्पादनात वाढ करणारी ठरेल. थोडासा प्रयत्न वाढवला हा तर नक्कीच यश मिळेल. र्आिथक प्रकरणात थेट फायदे नसले तरी वायदे अनुकूल ठरतील. राजकीय क्षेत्रात भूलथापांना बळी पडू नका. नातेवाईकांशी संवादातूनच गोडी वाढवा. वैवाहिक जीवनातील रुसवेफुगवे कमी होतील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. >> शुभ दिनांक : २१, २२ >> महिलांसाठी : गोड बोलून कामे होऊ लागतील हे विसरू नका.
-
१९ जानेवारी रोजी अस्तंगत होणारा गुरू चतुर्थ स्थानात असून शनीसुद्धा अस्तंगत आहे. महत्त्वाचे निर्णय कुटुंबाला धरून घ्या. समजुतीने घेतलेल्या गोष्टींमध्ये पर्यायी मार्ग निघू शकतो. नोकरीची नवी वाटचाल चालू होईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. व्यवसायामध्ये स्थिरता वाढेल. भागीदारी व्यवसाय सोपे नसले तरी अवघडही नाही. प्रसंगावधान राखून आयात-निर्यात वाढवा. व्यापारी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आर्किषत करण्यासाठी काही जाहिराती समोर येतील, पण खात्री झाल्याशिवाय करार करू नका. र्आिथकदृष्ट्या ध्येय सफल होईल. सार्वजनिक क्षेत्रात आपले व्यक्तिमत्त्व खुलेल. भावंडांचे प्रश्न सलोख्याने सोडवाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ अपेक्षित राहील. प्रकृतीबाबतीत सकारात्मक बदल करा. >> शुभ दिनांक : १७, २१ >> महिलांसाठी : मुद्दे प्रतिष्ठेचे बनवू नका.
-
व्ययस्थानातील गुरू १९ जानेवारी रोजी अस्तंगत होत आहे. त्याच स्थानातील शनीसुद्धा अस्तंगत आहे. अनेक दिवसांपासून होत असलेल्या त्रासाचा कालावधी कमी होईल. जिद्दीने व चिकाटीने केलेल्या कामाचे फळ चांगले मिळेल. नोकरीमध्ये हलाखीची परिस्थिती कमी होईल. सरकारी कर्मचारी वर्गाला पेचात पडणाऱ्या गोष्टींचा सामना कमी होईल. व्यवसायात अनेक स्तरांवरून चालून संधी येतील. खरेदी-विक्रीचे व्यवहार व्यवस्थित चालू राहतील. नवा उत्पादनाचा स्रोत सुरू होईल. वेगाने कामातील उत्साह वाढेल. पैशांचा प्रश्न सुटणारा असेल. राजकीय क्षेत्रातील नियोजन यशस्वी ठरेल. वैवाहिक जीवन सुखकर असेल. कुटुंबातील तिढा सोडवण्यासाठी ज्येष्ठांकडून योग्य मार्ग मिळेल. प्रकृतीचे स्वास्थ्य उत्तम राहील>>. शुभ दिनांक : १७, १८ >> महिलांसाठी : नवे चांगले विचार आत्मसात करा.
-
१९ जानेवारी रोजी गुरू मकर राशीत अस्तंगत होत आहे. शनीही अस्तंगत आहे. प्रतिष्ठा पणाला लावून कोणतेही धाडस वाढवू नका. नोकरीमध्ये गुलदस्त्यातील गोष्ट उघडी करू नका. स्पष्ट बोलण्याने मने दुखावली जाणार नाहीत याची दक्षता घ्या. अडलेल्या कामांसाठी ज्येष्ठांचे पाठबळ मिळेल. व्यावसायिक गोष्टीत काल्पनिक अंदाज बांधणे बंद करा. भागीदारी व्यवसायात बराच कालावधी गेल्यानंतर प्रगती दिसून येईल. हिशोबाचे ताळतंत्र चुकू ठेवा. कर्जाची वेळेवर परत फेड करा. अनावश्यक गोष्टींचा समावेश कमी करा. बचतीत वाढ करण्याचा प्रयत्न राहू द्या. सामाजिक स्तरावर विकास घडेल. घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा. >> शुभ दिनांक : १८, १९ >> महिलांसाठी : आळस झटकून कामाला लागा.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य