-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबा ठाकरे यांची आज जयंती. प्रबोधनकारांचे वारसदार, झुंजार नेते आणि परखड वक्ते असलेल्या बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. त्यांच्या राजकीय प्रवासाचं दर्शन घडवणाऱ्या काही दुर्मिळ छायाचित्रांवर जयंतीनिमित्त टाकलेला प्रकाशझोत. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
शिवसेना नेते सुधीर जोशी आंघोळ करत असताना त्यांच्या समवेत गप्पा मारणारे बाळासाहेब.
-
'जाणता राजा'च्या प्रयोगावेळी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
-
शिवसेना नेते सुभाष देसाई, मनोहर जोशींसोबत कॅरम खेळताना बाळासाहेब ठाकरे.
-
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत चर्चा करताना बाळासाहेब ठाकरे.
-
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना सन्मानित करताना बाळासाहेब.
-
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत गप्पांमध्ये रममाण झालेले बाळासाहेब.
-
१९९३ साली शिवसेना-भाजप युती झाली त्यावेळी टिपलेला क्षण. यात प्रमोद महाजन, बाळासाहेब, लालकृष्ण अडवाणी आणि मनोहर जोशी.
-
माजी पंतप्रधान व भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
-
एनरॉन प्रमुख रेबेका यांच्याशी चर्चा करताना बाळासाहेब ठाकरे.
-
मुस्लिम बांधवांनी आणलेला केप कापून वाढदिवस साजरा करताना बाळासाहेब.
-
आर.के.लक्ष्मण यांच्या पुस्तकाचे अनावरण करताना गोपीनाथ मुंडे, बाळ ठाकरे, पीसी अलेक्झांडर आणि आर.के,लक्ष्मण.
गडगंज श्रीमंती लाभणार, मंगळ करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी