-
नोव्हेंबरच्या अखेरीस तृणमूल काँग्रेसला गळती लागली. राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले आणि पक्षातील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांची साथ सोडत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिथूनच तृणमूलची गळती सुरू झाली. (छायाचित्र/पीटीआय)
-
परिवहन, जलसिंचन, जलस्त्रोत व विकास ही महत्त्वाची तीन खाती तसेच हलदिया विकास प्राधिकरणचे अध्यक्षपद असलेल्या सुवेंदू यांनी अचानक राजीनामा दिल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
तब्बल १८ विधानसभा मतदारसंघांवर अधिकारी घराण्याचा प्रभाव टिकवून असल्याने सुवेंदू हे तृणमूलसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्नही ममता बॅनर्जी यांनी करून पाहिला होता. पण त्यात तृणमूलला यश आलं नाही. (छायाचित्र/पीटीआय)
-
पुढे सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर ते ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्रमक होताना दिसले. तर ममता बॅनर्जी यांनीही आपल्या पारंपरिक मतदारसंघाचा त्याग करत नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात दंड थोपटले. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
नंदीग्राममधील भूसंपादनाच्या विरोधात झालेल्या आंदोलनाच्या ताकदीवर ममता यांनी २०११ साली राज्यातील सत्ता हस्तगत केली होती आणि त्यांचे निकटचे सहकारी असलेले सुवेंदु हे येथील आंदोलनाचा चेहरा होते. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
-
ब्रिटिश राजवटीविरोधात लढलेल्या सरकार कुटुंबात जन्मलेले सुवेंदू हे स्वतंत्र बाणा राखणारे नेते म्हणून पश्चिम बंगालच्या राजकारणात परिचित आहेत. सुवेंदू अधिकारी यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
१९८९ मध्ये सुवेंदू अधिकारी यांनी छात्र परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. २००६ मध्ये ते ‘कांता दक्षिण’मधून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग दोनदा तमलूक मतदारसंघाचे खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
२०१६ मध्ये नंदिग्राममधून निवडून गेल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी व रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या पक्षातील चलतीने सुवेंदू अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी तृणमूल काँग्रेस सोडल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
-
दरम्यान, सुवेंदू यांनी आता ममतांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली असून, “श्यामा प्रसाद मुखर्जी नसते, तर हा देश इस्लामिक राष्ट्र बनला असता आणि आपण बांगलादेशात राहत असतो. जर तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर पश्चिम बंगालची परिस्थिती जम्मू व काश्मीर होईल, ” अशी टीका सुवेंदू यांनी केलेली आहे.

५० वर्षांनंतर गुरुच्या राशीमध्ये निर्माण होईल मालव्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग! या ३ राशीच्या लोकांना मिळेल अपार पैसा आणि पद प्रतिष्ठा