-
वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो.
-
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार लाभदायक असल्याचं मानलं जातं.
-
या दिवसाचे हिंदू परंपरेत खूप महत्वाचे स्थान आहे. या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते.
-
वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातला तिसरा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या वतीने अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
-
कोविडमुळे साध्या पध्दतीने आंबा महोत्सव करण्यात आला असून, दगडूशेठ गणपतीला १,१११ हापूस आंब्याची आरास करण्यात आली.
-
हा आंब्याचा प्रसाद ससून येथील रुग्णांना वाटप केला जाणार आहे.
-
देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई यांनी दरवर्षीप्रमाणे आंबे देऊन श्री चरणी सेवा अर्पण केली.
-
अशी एक श्रद्धा आहे की अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेकजण सोन्यांची खरेदी करतात.
-
सर्व गणेशभक्तांना अक्षय्य तृतीया व आंबा महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल