-
पुण्यातील रेसकोर्स येथून टिपलेले सूपरमूनचे हे दृश्य! बुधवार २६ मे रोजी संध्याकाळी भारतात वर्षातील शेवटच्या सूपरमूनचे दर्शन झाले. फोटो – अरुल होरिझॉन
-
बुधवारी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० कि.मीटर अंतरावर आला. त्यामुळे तो मोठा व जास्त तेजस्वी दिसत होता. बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुपरमून दिसू लागला. फोटो – अरुल होरिझॉन
-
बुधवारी मध्यरात्री आणि गुरुवारी पहाटे हा सूपरमून दिसत राहून गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास सूपरमून आकाशातून दिसेनासा होईल. फोटो – अरुल होरिझॉन
-
पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळच्या बिंदूवर येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून म्हणतात. फोटो – अरुल होरिझॉन
-
चंद्राची पृथ्वीभोवती फिण्याची कक्षा लम्बवर्तुळाकार आहे. जेव्हा त्याचे पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर ४,०६,६९२ किलोमीटर असते, त्यावेळी तो अपोजी बिंदूवर असतो. तर कमीतकमी अंतर ३,५६,५०० किलोमीटर असताना तो पेरिजी बिंदूवर असतो. फोटो – अरुल होरिझॉन
-
पेरिजी बिंदूजवळ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आल्यास त्याचा आकार नेहमीपेक्षा १४ टक्क्यांनी मोठा आणि ३० टक्क्यांनी जास्त प्रकाशित दिसतो या खगोलीय घटनेला ‘सुपरमून’ म्हणतात. फोटो – अरुल होरिझॉन
-
जेव्हाजेव्हा चंद्र पृथ्वीपासून ३,६१,८८५ किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असतो, तेव्हाच्या पौर्णिमेला सुपरमून दिसतो. फोटो – अरुल होरिझॉन

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”