-
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज ४९वा वाढदिवस.
-
योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडमधल्या पौडी गढवाल जिल्ह्यातल्या पंजूर गावात झाला.योगी यांना एकूण सात भाऊ-बहिण असून योगी यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.(सौजन्यः पीटीआय)
-
योगी यांचं मूळ नाव अजय सिंह बिश्त होतं. मात्र त्यांनी १५ फेब्रुवारी १९९४ रोजी नाथ सांप्रदायाची दीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांनी आपलं नाव बदललं. २२ वर्षांच्या वयातच ते योगी आदित्यनाथ झाले. (सौजन्यः इंडियन एक्स्प्रेस)
-
योगी आदित्यनाथ यांनी गढवाल विश्वविद्यालयातून गणित विषयात पदवी प्राप्त केली आहे. (सौजन्यः इंडियन एक्स्प्रेस)
-
वयाच्या २६व्या वर्षी योगी यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि ते संसदेत पोहोचले. सर्वात कमी वयात पहिलीच निवडणूक जिंकून खासदार बनल्याचा मान योगी यांनी मिळवला.(सौजन्यः इंडियन एक्स्प्रेस)
-
योगी यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांना अनेक वेळा टीकेचा सामना करावा लागला. त्यांच्यावर धर्मविरोधी भाषण केल्याचे आरोपही अनेकवेळा झाले. गोरखपूरमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीमुळे योगी यांना कारागृहातही जावं लागलं होतं.(सौजन्यः इंडियन एक्स्प्रेस)
-
योगी आदित्यनाथ यांनी १९९८, १९९९, २००४, २००९, २०१४ अशा सर्व लोकसभा निवडणुका जिंकल्या. (सौजन्यः पीटीआय)
-
२०१७ सालच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा निवडून आल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. १९ मार्च २०१७ रोजी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.(सौजन्यः इंडियन एक्स्प्रेस)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…