-
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पन्नास टक्के प्रवासी क्षमतेची अट असल्यामुळे अडचणींमुळे बेस्ट प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. (सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
सोमवारपासून (७ जून) निर्बंध शिथिल झाले आणि बेस्ट उपक्रमालाही पूर्ण प्रवासी क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी मिळाली. परंतु तरीही बेस्टच्या थांब्यावर प्रवाशांच्या रांगा कायम होत्या.
-
उभ्याने प्रवास करण्याची परवानगी नसल्याने अनेकजण बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र होते.
-
बसमधील दरवाजातून प्रवेश करतानाही प्रवासी एकच गर्दी करत होते.
-
सरकारी व खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाल्याने सकाळी व सायंकाळी बस थांब्यावर गर्दी होती.
-
राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी, पालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं