-
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज (१० जून) २२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. महाराष्ट्रात अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी २०१४ २०१९ चा काळ प्रचंड खडतर राहिला. मात्र, त्यातून मुसंडी मारत महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने स्वतः अस्तित्वाची जाणीव करून दिली. या काळातील घडामोडी जशा लक्ष वेधून घेणाऱ्या आहे. तितकीच खास गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माची…. (प्रातिनिधिक छायाचित्र। राष्ट्रवादी काँग्रेस इन्स्टाग्राम)
-
मुंबईतील षण्मुखानंद सभागृह आणि शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनेच्या बैठका आणि मेळावा असंच अनेकांना माहिती असेल, पण या षण्मुखानंद सभागृहाशी आणि शिवाजी पार्कशी राष्ट्रवादी काँग्रेसचही खास नातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची नाळ इथेच रुजली असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि नाव निश्चित झालं, तेच मुळात षण्मुखानंद सभागृहात. शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांच्यावर काँग्रेसनं कारवाई केल्यानंतर नवा राजकीय मार्ग शोधण्यासाठी या नेत्यांसह समर्थकांची मुंबईत एक बैठक झाली. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
याच बैठकीतच नव्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस असं निश्चित करण्यात आलं. यात मजेशीर बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह घड्याळ असलं, तरी बैठकीत मात्र, चरखा या निवडणूक चिन्हावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. नंतर हे चिन्ह कसं बदललं त्याचं कारण पुढे कळेलच. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
या बैठकीनंतर १७ जून १९९९ रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सकाळी बैठक झाली. या बैठकीत पक्षाची घटना, पदाधिकारी आणि कार्यकारिणीचा ठराव मांडण्यात आला. या सगळं इतकं वेगात घडत होतं. षण्मुखानंदमधील बैठक पार पडल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अधिवेशन आयोजित करण्यात आलं. (छायाचित्र। पीटीआय )
-
राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिलं अधिवेशनं झाले ते शिवाजी पार्कवर! याचं अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. (छायाचित्र। राष्ट्रवादी काँग्रेस इन्स्टाग्राम)
-
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती छगन भुजबळ यांच्यावर. स्थापनेनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली मूळ बळकट करण्यास सुरू केलं गेलं. (छायाचित्र। राष्ट्रवादी काँग्रेस इन्स्टाग्राम)
-
पक्ष विस्तारत असतानाच प्रश्न होता निवडणूक आयोगाच्या मान्यतेचा… कालांतराने पक्षाची नोंदणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. निवडणूक आयोगाकडे नोंदणी करत असताना पक्षाने चरखा या निवडणूक चिन्हाची मागणी केली होती. इथे आयोगाने पक्षाला मान्यता दिली, पण चरखा चिन्ह देण्याची मागणी नाकारली. (छायाचित्र। राष्ट्रवादी काँग्रेस इन्स्टाग्राम)
-
निवडणूक आयोगाने दुसरं निवडणूक चिन्ह सूचवण्याची सूचना केली. त्यामुळे आता काय? त्यानंतर घड्याळ या चिन्हाची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. आता निवडणूक चिन्ह म्हणून घड्याळाच का सूचवलं गेलं? तर मागेही एक खास कारण होतं. (छायाचित्र। राष्ट्रवादी काँग्रेस इन्स्टाग्राम)
-
निवडणूक आयोगाने दुसरं निवडणूक चिन्ह सूचवण्याची मागणी केल्यानंतर दहा वाजून दहा मिनिटं ही वेळ दाखवणार घड्याळ हे चिन्ह सूचवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची जी बैठक षण्मुखानंद सभागृहात झाली होती. ती बैठक दहा वाजून दहा मिनिटांनी सुरू झाली होती. त्यामुळे ही वेळ दाखवणार घड्याळ हे चिन्ह मागण्यात आलं. (छायाचित्र। राष्ट्रवादी काँग्रेस इन्स्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य