-
आज NIA ने माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये हा छापा टाकल्याचं समजत आहे. कोण आहेत हे प्रदीप शर्मा? जाणून घ्या…
-
माजी पोलिस अधिकारी आणि अंबानी स्फोटक प्रकरणामुळे वादात सापडलेले सचिन वाझे यांच्याशी प्रदीप शर्मा यांचे जवळचे संबंध असल्याचं समोर येत आहे.
-
१९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द वादात राहिली आहे. प्रदीप शर्मा हे ठाण्याच्या क्राईम ब्रांचमध्ये रुजू झाले होते. त्यांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली होती.
-
प्रदीप शर्मा यांनी आत्तापर्यंत ३०० पेक्षा जास्त गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले आहे. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध या आरोपांमुळे २००८ मध्ये शर्मा यांना निलंबित करण्यात आलं होतं.
-
लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्यासह १३ जणांना अटकही करण्यात आली होती. मात्र २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शर्मा यांची आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांमधूनही त्यांची मुक्तता करण्यात आली.
-
सगळ्या आरोपांतून मुक्त झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पोलीस दलात रुजू करून घ्यावं म्हणून प्रदीप शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. काही महिने दुर्लक्ष केल्यानंतर गृहखात्याने त्यांना पोलीस सेवेत रुजू करून घेतलं. मात्र ४ जुलै २०१९ रोजी त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.
-
त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१९ साली मुंबईतून निवडणूकही लढले.
-
'अब तक छप्पन' हा सिनेमा त्यांच्या कारकीर्दीवर बेतलेला असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये नाना पाटेकरने त्यांची भूमिका साकारली होती. तर काही वर्षापूर्वीच 'रेगे' हा मराठी सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता जो त्यांच्यावरच आधारित असल्याचंही सांगितलं जातं. या सिनेमात महेश मांजरेकर यांनी त्यांची भूमिका साकारली होती.

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…