-
मान्सून दाखल झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार पाऊल टाकलं. पुण्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार कायम असून, पंचगंगेचं पात्र पुन्हा प्रवाही झालं आहे. (सर्व छायाचित्रं । सारंग दास)
-
दुसरीकडे कृष्णा नदीचं पात्रही ओसंडून वाहत असून, पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीची पातळी झपाट्याने वाढली आहे.
-
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे कृष्णा, पंचगंगा नदी सह सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणांमधील पाणीसाठा ही वाढत चालला आहे. पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. नदीमध्ये बचाव पथकाची प्रात्यक्षिके सुरू आहेत.
-
राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे दोन वाजता संपन्न झाला.
-
पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीची पातळी झपाट्याने वाढली असून, दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. कृष्णा नदीचे पाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे 'श्री चरण कमला'वरून बाहेर पडते यालाच दक्षिणद्वार सोहळा म्हणतात.
-
ही एक पवित्र स्नानाची पर्वणी समजली जाते. करोना महामारीमुळे दत्त दर्शन बंद असल्यामुळे भाविकांना व नागरिकांना या पर्वणी स्नानाचा आनंद लुटता आला नाही, अशी खंत दत्त देवस्थानचे माजी सचिव विनोद पुजारी यांनी व्यक्त केली.
-
मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून भाविकांनी टीव्हीवरूनच दर्शन घेतलं.
-
आज पहाटे दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला त्यावेळी निम्म्याहून अधिक मंदिर कृष्णा नदीच्या पाण्याखाली गेलं होतं. नदीची पातळी कालपासून पंधरा ते वीस फुटापर्यंत वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रं । सारंग दास)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”