-
पुणे महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये आज नगरसेवकांनीच करोनासंदर्भातील नियम मोडल्याचं चित्र पहायला मिळालं.
-
करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे शहराचे नियम शिथिल करण्यात आले. मात्र मागील अनेक महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन घेतली जात होती.
-
पुणे शहराचे नियम शिथिल झाल्याने, सभागृह चालविण्यास परवानगी शासनाकडून मिळाली आहे.
-
आज पुणे माहानगरपालिकेची सर्व साधारण सभा घेण्यात आली.
-
मात्र या सभेमध्ये अनेक नगरसेवकांनी मास्क न घालता बसले होते.
-
इतकच नाही तर या सभेमध्ये नगरसेवकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन केलं नसल्याचंही दिसून आलं.
-
काही नगरसेवक तोंडावरील मास्क काढून आरामात बसलेले,
-
काही महिला नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग विसरुन अशाप्रकारे एकमेकांशी गप्पा मारत होत्या.
-
अनेक नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग विसरुन अगदी एकमेकांना खेटून बसलेले.
-
अनेकांनी मास्कच घातले नव्हते. त्यामुळे पुणेकरांकडून करोना नियमांचे पालन करण्याची अपेक्षा कऱणाऱ्या नगरसेवकांनी कृतीतून आदर्श घालून देण्याची गरज असल्याची चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल