-
मुंबई-पुण्यातील प्रत्येक पर्यटकांचं आवडीच ठिकाण असलेलं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झालं असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. (सर्व फोटो : कृष्णा पांचाळ/ लोकसत्ता डॉट कॉम)
-
लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झालं .
-
परंतु, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यटकांना या धरणावर जाऊन भिजण्याच्या आनंदाला मुकावं लागणार आहे.
-
भुशी धरण परिसरामध्ये पर्यटकांना येण्यास बंदी आहे.
-
मात्र, तरी अनेक पर्यटक बंदी झुगारून थेट भुशी धरणापर्यंत पोहचल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
-
पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.
-
पुणे आणि मुंबईकरांच हक्काचं आणि आवडीचं पर्यटनस्थळ असलेलं भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे.
-
पुणे आणि मुंबईकरांच हक्काचं आणि आवडीचं पर्यटनस्थळ असलेलं भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे.
-
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण खूप अगोदर भरल्याने पर्यटकांची पावलं आपसूकच धरणाच्या दिशेने पडत आहेत. गेल्या आठवडाभरापासून लोणावळा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत.
-
याचमुळे लोणावळ्याचा परिसर अत्यंत नयनरम्य झाला असून डोंगर दऱ्या हिरवा शालू परिधान केल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही.
-
सहयाद्रीच्या पर्वतरांगांच्या डोंगरकड्यांमधून छोटे मोठे धबधबे कोसळत असून त्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
-
गेल्या वर्षीपासून करोना महामारीच संकट असून याचमुळे अद्याप या पर्यटनस्थळांवर भटकंती करण्यास नागरिकांना मज्जाव घालण्यात आला आहे.
-
गेल्या रविवारी लोणावळ्याच्या सहारा पुलापाशी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. अक्षरशः लोणावळा पोलिसांना विनवणी करून त्यांना परत पाठवाव लागलं होतं.
-
आजही भुशी धरणावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावलं.
-
पर्यटकांना हुसकावून लावल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
-
इतर ठिकाणाहून पर्यटनबंदी हटवण्यात आली आहे मग पुणे जिल्ह्यातच का? असा प्रश्न व्यापारी वर्ग विचारत आहे.
-
गर्दी पाहता लोणावळ्यातील पर्यटनस्थळी येण्याअगोदर एकदा नक्की विचार करणं गरजेचं आहे.
-
अनेक पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाहीय.
-
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण खूप अगोदर भरलं आहे.
-
दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते.
-
गर्दी पाहता लोणावळ्यातील पर्यटनस्थळी येण्याअगोदर एकदा नक्की विचार करणं गरजेचं आहे.
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य