-
मेष : अडथळे कमी होतील सप्ताहात होणारी पौर्णिमा शुभ फलदायी ठरेल. इच्छा अपेक्षा पूर्ण होण्याच्या मार्गी असतील. थांबलेले चक्र पुन्हा गती घेऊ लागेल. नोकरदार वर्गाला नवीन प्रस्ताव स्वीकारण्यास हरकत नाही. दोलायमान स्थितीतून बाहेर पडाल. आतापर्यंत ज्येष्ठांचा तुमच्याविषयी असलेला गैरसमज दूर होईल. व्यवसायात इतरांवर अवलंबून राहण्याचा कालावधी संपेल. स्वतङ्मचे अस्तित्व निर्माण करण्यास आता वेळ लागणार नाही. व्यापारी वर्गाला अपेक्षित फलप्राप्ती होईल. तांत्रिक अडथळे कमी होतील. आर्थिकदृष्ट्या चांगली मजल मारता येईल. सामाजिक माध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. सासुरवाडीकढील लोकांमध्ये हस्तक्षेप करणे टाळा. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. कौटुंबिकदृष्ट्या एक मत राहू द्या. शारीरिक ताण तणाव कमी कसा होईल याकडे लक्ष द्या. शुभ दिनांक : २४ , २५ महिलांसाठी : सौंदर्यप्रसाधनांची आवड निर्माण होईल. (स्मिता अतुल गायकवाड)
-
वृषभ : धीर धरा चंद्रग्रहाचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. तेव्हा कोणत्याच गोष्टीत घाई करून चालणार नाही. थोडा धीर धरा. विचार करून निर्णय घेणे योग्य राहील. पौर्णिमा कालावधीत वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार वर्गाला कामाची जबाबदारी वाढेल. कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वेळ न घालवता काम करा. व्यवसायामध्ये अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. उधारीचा व्यवहार टाळा. नवीन गुंतवणूक सध्या नाही केलेली चांगली. खर्चाचे नियोजन केल्यास आर्थिक त्रास कमी होईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे टाळा. नातेवाईकांशी संवाद साधून जुन्या गोष्टी उगाळू नका. मानसिक शांतता राखण्यासाठी आध्यात्मिक गोष्टीत मन रमवा. शारीरिकदृष्ट्या निष्काळजीपणा टाळा. शुभ दिनांक : २२, २६ महिलांसाठी : तडजोडीतून यश मिळणार आहे. हे लक्षात ठेवा.
-
मिथुन : प्रकृतीची काळजी घ्या ग्रहांचा कल साथ देणारा नसला तरी वाईटही नाही. पौर्णिमा कालावधीत मनातील वादळ बाजूला ठेवून पौर्णिमा सुखकर करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल असे धरू नका. त्यासाठी तुम्हाला स्वतङ्मला बदलावे लागेल. समजून घेण्याची वृत्ती सप्ताहात वाढवावी लागेल. नोकरदार वर्गाला दगदग होईल. मात्र ती योग्य कारणासाठी असेल. असा विचार करा. शांतपणाने कृती केल्यास त्रास होणार नाही. व्यवसायामध्ये आवक बघून जावक ठरवा. भागीदारी व्यवसायात नव्याने गुंतवणूक करणे टाळा. व्यवसायात आहे त्यातच समाधान मानावे लागेल. आर्थिकदृष्ट्या बचत वाढवण्याकडे लक्ष केंद्रित करा. मित्रांमार्फत येणाऱ्या संधीचा विचार करा. कुटुंबाशी मिळून मिसळून राहा. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक : २०, २५ महिलांसाठी : जोडीदारा समवेत करमणुकीचा आनंद लुटा.
-
कर्क : सुवर्णमध्य निघेल पौर्णिमा प्रहरात बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत पडू नका. स्वतङ्मच्या तोंडातून वाईट गोष्ट बोलू नका. शांत राहा. नोकरदार वर्गाला कामाचा अंदाज घेता येईल. दडपणाखालचे अस्तित्व दूर होईल. वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या वेळेत कामे पूर्ण कराल. व्यवसाय क्षेत्रात उत्पन्न वाढ चांगली असेल. मोठ्या व्यवसायिकांना कामगारांविषयी असलेली अडचण कमी होईल. गैरसोयीची परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. कामकाजाचे नियोजन व्यवस्थित कराल. आर्थिकदृष्ट्या सुवर्णमध्य निघेल. सार्वजनिक ठिकाणाहून ऐकावयास मिळणाऱ्या बातमीवर विश्वास ठेवू नका. मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्या. नातेवाइकांकडून शुभेच्छा मिळाल्यामुळे उत्साह वाढेल. आध्यात्मिक गोष्टींची आवड राहील. शरीर प्रकृती साथ देईल. शुभ दिनांक : २०, २२ महिलांसाठी : मन मोकळेपणाने विचार व्यतीत करा.
-
सिंह : योग्य सल्ला मिळेल पौर्णिमा मनाचा उत्साह वाढवणारी असेल. ठरवलेले ध्येय वेळेत पूर्ण कराल. आतापर्यंत असणारे आडकाठी मात्र कमी होणारी असेल. उशिरा का होईना शुभ फळ मिळाल्याचा आनंद होईल. नोकरदार वर्गाला नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात यश मिळेल. काहींना बढतीचे योग उत्तम राहतील. ज्येष्ठांकडून कौतुक होईल. व्यापारी क्षेत्र विस्तारेल. नवीन व्यवसायात वाढ चांगली राहील. गुंतवणूक करणे सहज जमेल. मागील थकबाकी वसुलीसाठी ज्यादा कष्ट करावे लागणार नाहीत. आर्थिकदृष्ट्या बचतीत वाढ होईल. राजकीय क्षेत्रात जबाबदारीने कामे पार पाडा. मैत्रीचे नाते दृढ होईल. संततीची गोड बातमी समजेल. घरातील थोरा मोठ्यांकडून योग्य सल्ला मिळेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ दिनांक : २४, २५ महिलांसाठी : भाग्याची साथ राहील.
-
कन्या : मनसुबे पूर्ण होतील आशादायक ग्रहांचा प्रवास मानाची उत्सुकता वाढवेल. पौर्णिमा कालावधीत घरातील ज्येष्ठांशी बोलताना टोकाचे अंतर गाठू नका. झालेल्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा. नोकरदार वर्गाला संघर्षदायक गोष्टींचा सामना कमी करावा लागेल. अधिकार प्राप्तीच्या बाबतीत थोडा उशीर झालेला असेल, मात्र आशेची बाजू तुमची सकारात्मकता वाढवणारी असेल. व्यवसायाच्या बाबतीत परिस्थितीचा अंदाज घेऊन अंमलबजावणी करावी लागेल. धरसोड वृत्ती कमी करा. अनेक योजना राबवण्याचे मनसुबे पूर्ण होतील. खर्चदायक गोष्टी कमी होतील. राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मित्रांच्या बाबतीत बोलण्याच्या भरात जास्तीची जबाबदारी घेऊ नका. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराच्या भावना जाणून घ्याल. आरोग्य ठणठणीत असेल. शुभ दिनांक : २०, २६ महिलांसाठी : मोलाची कामगिरी बजावाल.
-
तूळ : मन:शांती लाभेल पौर्णिमा कालावधीत तुमचे धाडसी नेतृत्व सिद्ध होईल. कोणती गोष्ट कोणत्या वेळेत करायची हे गणित मात्र सप्ताहात खूप चांगले जमेल. धीराने घेतलेल्या कामांमध्ये मोठे यश मिळेल. नोकरदार वर्गाला बौद्धिक क्षेत्रात नवीन तंत्र हाती येईल. वरचेवर संधी मिळण्याचा प्रयत्न विशेष लाभदायक ठरेल. व्यवसायाला मोठे स्वरूप देण्याचा वेग वाढेल. एकाच गोष्टीऐवजी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल. त्याचे निश्चितच फळ मिळेल. चौकसपणे घेतलेले निर्णय पचनी पडतील. आर्थिक व्यवहारात आलेला ताण कमी होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती व प्रतिष्ठेच्या मागे पळू नका. भावंडांशी होणारा संवाद जुना वाद मिटवणारा असेल. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना मन:शांती लाभेल. वैवाहिक वाद-विवाद कमी होईल. आरोग्याची साथ राहील. शुभ दिनांक : २०, २४ महिलांसाठी : मानसिक अस्वस्थता कमी होईल.
-
वृश्चिक : अनुमान बरोबर येईल दिनांक २०, २१ हे दिवस दमदार नसले तरी वाईटही नाहीत. मात्र घाईगडबडीने पाऊल न टाकता विचाराने कृती करा. पौर्णिमा धनप्राप्तीचे मार्ग मोकळे करणारी असेल. गोष्टी हातात नव्हत्या त्यावेळी मार्गच मिळत नव्हता. आता तसे न होता योग्य दिशा सापडेल. इतरांची मदत न घेता स्वतङ्मच गती वाढवाल. नोकरदार वर्गाला तुमचा चिवटपणा स्थिर राहण्यास मदत करेल. अनेक गोष्टींचा तर्कवितर्क करणे सोपे जाईल. वरिष्ठांचे वर्चस्व चांगले राहील. व्यवसायातील चढ-उताराचा सामना कमी होईल. व्यवसायाचा आलेख चढता राहील. खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत पार पडतील. आर्थिकदृष्ट्या अनुमान बरोबर येईल. सामाजिक स्तरावर योग्य समतोल साधाल. नातेवाईकांशी जेवढ्यास तेवढा संवाद साधा. शारीरिकदृष्ट्या त्रास कमी होईल. शुभ दिनांक : २४, २५ महिलांसाठी : ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नका.
-
धनू : चौफेर विचार महत्त्वाचा तारेवरची कसरत आता संपणार आहे, असे असले तरी प्रयत्न सोडून चालणार नाही. उद्याच्या गोष्टीवर झुरत बसण्यापेक्षा आजचे नियोजन आजच करा. प्रत्येक वेळी जमेची बाजू असेल असे धरू नका. बदल स्वीकारून पुढे चला. पौर्णिमा काळात संघर्षदायक वातावरण करू नका. इतरांच्या मतांनाही प्राधान्य द्या. नोकरदार वर्ग आणि परिस्थितीचा अंदाज घ्या. वास्तवतेला महत्त्व द्या. व्यावसायिक स्थर लक्षात घ्या. एखादे विश्वासनीय काम इतरांवर टाकू नका. स्वतङ्म काही नियमांचे पालन करा. न जमणाऱ्या गोष्टी करूच नका. कायद्यांचे उल्लंघन टाळा. आर्थिक बाबतीत चौफेर विचार महत्त्वाचा राहील. घरगुती वातावरण पोषक कसे राहील. याचा विचार करा. जोडीदाराचा सल्ला घ्या. शारीरिकदृष्ट्या आळस करणे योग्य नाही. शुभ दिनांक : २५,२६ महिलांसाठी : भावनिक गोष्टींवर विचार करणे टाळा.
-
मकर : यशाचे गणित जमेल पौर्णिमा काळात नकळत घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. निराशा वृत्ती ठेवू नका. त्याने कोणतेच काम साध्य होत नाही. अति विचारातून बाहेर पडा व पौर्णिमा शुभदायक करा. नोकरदार वर्गाने आजचे काम आजच करा. उद्यावर ढकलू नका. त्यामुळे कामाचा भार बऱ्यापैकी कमी होईल. व्यवसायात मागील काही दिवस अडचणीची गेले. सध्या मात्र तसे न होता व्यवसायातील चढ-उतार नेहमीपेक्षा चांगला असेल. यशाचे गणित आता चांगले जमू लागेल. धनदायक गोष्टींचा मार्ग मोकळा होईल. सार्वजनिक क्षेत्रात पदार्पण कराल. स्वार्थी व धूर्त मित्रांपासून लांब राहा. मुलांच्या बाबतीत सतर्कता बाळगा. कुटुंबाविषयी असणारे गैरसमज वेळीच दूर होतील. आध्यात्मिक गोष्टींची आवड निर्माण होईल. प्रकृती उत्तम राहील. शुभ दिनांक : २०,२२ महिलांसाठी : अडचणींवर मात करायला शिकाल.
-
कुंभ : लाभदायक सप्ताह चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. पौर्णिमा काळात मिळणारा शुभ संकेत आनंद निर्माण करेल. नवीन काही होणारे बदल मनाला उभारी देणारे असतील. असे बदल चटकन स्वीकारा. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. मागील कामातील त्रुटी भरून निघतील. वरिष्ठांचे सहकार्य उत्तम राहील. वेतनवाढीचा प्रश्न सुटेल. व्यवसायामध्ये मोठ्या व्यापारी वर्गाचा प्रगतीकडे कल असेल. स्थिर अवस्था यायला आता वेळ लागणार नाही. मोठा उत्साह वाढेल. गुंतवणूक केलेल्या उत्पादनातून फायदा मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगली फळे मिळतील. राजकीय क्षेत्रात परिवर्तन घडेल. मित्रमंडळींची करमणूक कराल. नातेवाईकांना तुमच्या मदतीची अपेक्षा असेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. सप्ताह लाभदायक असेल. शारीरिक तंदुरुस्ती उत्तम राहील. शुभ दिनांक : २४, २५ महिलांसाठी : श्रमाचे फळ मिळेल.
-
मीन : जबाबदारी पार पाडाल चंद्रग्रहाची अनुकूलता उत्तम असेल. शुभ योगांची साथ मिळेल. मनावरचे दडपण कमी होईल. प्रत्येक वेळी संवादातून होणारा मनस्ताप होत होता, सध्या ती परिस्थिती नसेल. तुमचा इतरांशी झालेला संवाद हा इतरांवर छाप पाडणारा असेल. सरकारी नोकरदार व्यक्तींचा जीव भांड्यात पडेल. नोकरीतील समस्यांचे निवारण होईल. व्यापारी क्षेत्रात आवक वाढल्याने तुमच्यासाठी जमेची बाजू असेल. व्यावसायिक स्तरावर उलाढाल वाढेल. पैशांची बचत होईल. सामाजिक क्षेत्रात ज्येष्ठ व्यक्तींचा आदर कराल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. मतभेदातून झालेली दुरी कमी होईल. कौटुंबिकदृष्ट्या जबाबदारी पार पाडाल. आध्यात्मिक गोष्टीत मन रमवून उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करा. व्याधींविषयी असलेली चिंता मिटेल. शुभ दिनांक : २२,२६ महिलांसाठी : हातचे राखून ठेवण्याची सवय जोपासा.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO