-
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. (छायाचित्र। भाजपा मीडिया सेल)
-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी झाले होते.
-
राज्यात २ हजारांहून अधिक ठिकाणी पक्षातर्फे योग दिनाचे कार्यक्रम झाले.
-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सागर या शासकीय निवासस्थानी योगसाधना केली.
-
मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित सहभागी झाले होते.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दर वर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
-
योगविद्येमुळे प्रतिकार शक्ती आणि मनाचे सामर्थ्य वाढत असल्याने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर योग विद्येचा अधिकाधिक प्रसार व्हावा या हेतूने भाजपा तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-
या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमांना पक्ष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
-
योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसाठी व जनतेसाठी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. (छायाचित्र। भाजपा मीडिया सेल)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल