-
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद निर्माण झाला आहे. दि.बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी आज आंदोलन केलं जात असून, या पार्श्वभूमीवर पनवेल शीव महामार्गावर आजपासून रोडपाली ते बेलापूर अशी वाहतूक बंद करण्यात आहे. त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागले. सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेली वाहतूक कोंडीतील वाहनांची रांग कामोठे वसाहतीपर्यंत पोहचली होती. कळंबोली सर्कल येथे जड व अवजड वाहने पनवेल मुंब्रा महामार्गाच्या दिशेने वळविण्यात आली मात्र पुरुषार्थ पंप (मार्बलबाजार) येथील उड्डाणपुल मुंबईकडे जाण्यासाठी बंद केल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आज गुरुवारी बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत.
-
पोलिसांनी बेलापूरच्या सिडको मुख्यालयाकडे येणारे सीबीडी महालक्ष्मी चौक, बेलापूर किल्ला, पार्क हॉटेल, पालिकेचे जुने मुख्यालय या चार मार्गांनी येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
-
मुंबईहून पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला ऐरोली, शिळफाटा मार्गे कळंबोलीला जावे लागणार असून त्यानंतर ही वाहने पुणे- गोव्याकडे जाऊ शकणार आहेत. तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांना तळोजा येथील पुरुषार्थ पेट्रोलपंपापासून वळण घेऊन शिळफाटा मार्गे मुंबईत जावे लागणार आहे.
-
वाशी टोलनाक्यावरून येणारी सर्व वाहने ही शिळफाटा मार्गानेच ये-जा करू शकणार आहेत. पोलिसांनी शीव-पनवेल मार्गावरील वाहतूक उरण फाटा ते खारघरपर्यंत बंद केली आहे. जड वाहनांना तर सकाळी आठ ते रात्रौ आठपर्यंत या भागात प्रवेशबंदी आहे.

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख