-
पुण्यातील आंबिल आढो परिसरात आज कारवाई करण्यात आली. परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात झाल्यानंतर स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचाही प्रयत्न झाला.
-
आंबिल ओढा परिसरात असलेल्या काही घरांवर बुलडोजर चालवण्यात आला. अचानक झालेल्या या कारवाईने स्थानिक नागरिकच चांगलेच संतापले.
-
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
-
गुरूवारी सकाळी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये झडप झाली.
-
बिल्डरकडून करण्यात आलेल्या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध केला आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या आंबिल ओढा परिसरात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
-
कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केला. कामगारांना आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढण्यात आलं.
-
महापालिकेनं आम्हाला नोटीस द्यायला हवी होती. पण, बिल्डरने नोटीस दिली. त्यावर महापालिकेचा शिक्काही नाही, असं स्थानिकांनी म्हटलं आहे.
-
पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि घरं पाडण्यास सुरुवात केली. राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असा आरोप स्थानिक नागरिक म्हणणे आहे.
-
पोलीस अचानक आले आणि आम्हाला घर खाली करण्यास सांगत आहेत. आम्हाला या कारवाईसंबंधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. आमचं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
-
आम्ही येथे ५० ते ६० वर्षांपासून राहत असून आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करा, अशी नागरिकांची मागणी आहे. तसंच पालिका नाही तर खासगी बिल्डरच्या नोटीशीनंतर कारवाई सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नोटीशीवर पुणे मनपाचा शिक्का का नाही? अशी विचारणा स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
-
घरातील सामानाचं सोडा. आमचं हातावर पोट आहे. आम्ही कुठे खायचं? भिक मागायची का? रस्त्यावर राहायचं का? पाऊस पडल्यावर काय? त्यात करोना आहे. आजारी पडल्यावर बिल्डर लोक पैसे देणार आहेत का? एका घरात आम्ही १५ लोक राहतो, हे सांगत असताना महिलांना अश्रु अनावर झाले.
-
दुसरी कोणतीही व्यवस्था न करता सकाळी बुलडोजर आणले. सोय न करता घरातील सामना काढून रस्त्यावर फेकून दिलं. ही कुठली पद्धत आहे. आंबिल ओढ्याचं पाणी शिरलं तेव्हाही बिल्डर आला नव्हता. आताही पोलीस पाठवून दिलेत, कुठे राहायचं आम्ही?, असा स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
-
बिल्डरकडून ही कारवाई केली जात असताना भाजपा आमदार मुक्ता टिळक यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. "पावसाळ्यात अशी कारवाई करायची नाही हे बैठकीत ठरलं होतं, पण ही कारवाई का केली असा प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला आहे? पण त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामागचं कारण शोधावं लागेल, जर सत्ताधारी भाजपाने पावसाळ्यात कारवाई करु नये असं ठरवलं होतं, तरीही ही कारवाई का झाली, राज्य सरकारशी चर्चा करुन प्रशासनावर कारवाई करण्याबाबत विचारणा करु," असं आमदार टिळक म्हणाल्या.
-
"मी पुण्याचा माजी महापौर आहे. महापौर जे निर्णय घेतात, ते प्रशासन ऐकतं, त्यामुळे राज्य सरकार किंवा प्रशासनाला दोष न देता, भाजपाने हात झटकू नये. आम्ही प्रशासन चालवलं आहे. सत्ताधाऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय प्रशासनन कारवाई करत नाही," असा आरोप राष्ट्रवादीचे पुण्याचे अध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपावर केला आहे.
-
जबरदस्ती कारवाई केली जात आहे. करोना आला आहे. पाऊस आला आहे, आम्ही जायचं कुठं, राहायचं कुठे. रस्त्यावर राहायचं का? आम्हाला जागा कुठेय? असं म्हणत स्थानिक महिलांनी आक्रोश केला.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल