-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. (सर्व फोटो – नरेंद्र वास्कर)
-
यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झाले आहेत.
-
यावेळी अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. ज्यावर "आमच्या 'दिबां'नी करुन त्याग, आम्हाला केलंय 'अस्सल' वाघ" असं लिहिण्यात आलं होतं. तसंच 'नकली वाघांनी अस्सल वाघाच्या वाटेला जाऊ नये' असा इशाराही दिला होता.
-
हे बॅनर्स. होर्डिंग पोलिसांनी कारवाई करत काढून टाकले.
-
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतून जाणारा शीव-पनवेल मार्गावरील बेलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून सर्व वाहतूक शीळफाटा मार्गे वळविण्यात आली आहे.
-
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल-शीव महामार्गावर रोडपाली ते बेलापूर अशी वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांना सामोरं जावं लागत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेली वाहतूक कोंडीतील वाहनांची रांग कामोठे वसाहतीपर्यंत पोहोचली होती. कळंबोली सर्कल येथे जड व अवजड वाहने पनवेल-मुंब्रा महामार्गाच्या दिशेने वळविण्यात आली. मात्र पुरुषार्थ पंप (मार्बलबाजार) येथील उड्डाणपुल मुंबईकडे जाण्यासाठी बंद केल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.
-
दरम्यान ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असून वाहतूक कोंडी झाली आहे.
-
या आंदोलनात फक्त भुमीपूत्र आणि प्रकल्पग्रस्त सहभागी झालेले नसून राजकीय नेतेदेखील सहभागी आहेत.
-
आंदोलनास सुरुवात करण्याआधी आंदोलक नेत्यांकडून दि बा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
-
दरम्यान दी बा पाटील यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली असून “बाळासाहेब ठाकरे किंवा दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं हा संघर्ष आत्ता सुरु झाला आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांनी कित्येक वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी मेहनत घेतली, जे काम केलं ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं असं वाटत असून आमचीदेखील तीच इच्छा आणि आग्रह आहे,” असं म्हटलं आहे.

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला! थोड्याच वेळात जाहीर होणार दहावीचा निकाल, मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण