-
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजपाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
-
या पार्श्वभूमीवर आज पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग देखील रोखण्याचा प्रयत्न केला गेला.
-
अर्धा ते पाऊण तास द्रुतगती मार्ग अडवण्यात आला.
-
यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी हातात झेंडा व फलक घेत घोषणाबाजी देखील केली.
-
एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपानं आंदोलन सुरू केलं आहे.
-
पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्याप्रमाणावर वाहतूक सुरू असते.
यामुळे पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. -
या ठिकाणी आंदोलनासाठी मोठ्यासंख्येने भाजपा कार्यकर्ते आले होते.
-
मोठ्यासंख्येने पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
-
पोलीस कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्तासाठी सूचना दिल्या होत्या.
-
द्रुतगती मार्ग अडवला जाणार असल्याची माहिती मिळाल्याने, पोलिसांचा अगोदरच बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
आज सकाळपासूनच भाजपानं राज्यातल्या विविध भागामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे.
-
ओबीसींना मिळालेलं राजकीय आरक्षण फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे, असा आरोप भाजपा नेत्यांनी केलेला आहे..
-
पोलीस दलाच्या फौजफाट्यासह पोलिसांची वाहनं देखील मोठ्याप्रमाणात दिसून आली.
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?