-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने यंदाही पायी वारीला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. (सर्व फोटो : राजेश स्टीफन, इंडियन एक्सप्रेस)
-
यावर्षीच्या आषाढी वारीसाठी दहा मानाच्या पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. अन्य पालख्या किंवा दिंड्यांना परवानगी नसल्याचे सांगण्यात आले आहे.
-
आळंदी आणि देहू येथील प्रस्थान सोहळ्यास प्रत्येकी १००, तर अन्य आठ पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यास ५० जणांना मुभा असणार आहे.
-
पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी दोन दिवस आधी सहभागी होणाऱ्या सर्वाच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा नकारात्मक अहवाल बंधनकारक असल्याने वारकऱ्यांकडून चाचण्या करण्यात येत आहेत.
-
दरम्यान, पादुकांसोबत विशेष वाहनाद्वारे प्रतिवाहन २० याप्रमाणे दोन वाहनांमधून ४० जणांनाच परवानगी असणार आहे. पादुका वाखरी येथे पोहोचल्यानंतर येथून पंढरपूपर्यंतचे अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्याला मान्यता देण्यात आली आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख