-
मेष : सप्ताह उत्तम घडामोडींचा ७ जुलै रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. वारंवार चालढकल करणाऱ्या गोष्टीतून मार्ग मिळेल. अमावास्या पराक्रमस्थानातून होत आहे. या कालावधीत भावंडांशी मात्र जुळवून घ्यावे लागेल. मानसिकदृष्ट्या धाडस वाढलेले असले तरी धीराने घ्या. नोकरदार वर्गाला त्रास असलेल्या गोष्टींचा सामना कमी करावा लागेल. स्वतङ्मची जबाबदारी पार पाडताना येणारा ताण कमी होणारा असेल. व्यापारी क्षेत्रात चांगली भरारी राहील. मोठ्या व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात उतरतील. कारखानदारी उद्योगाला गती मिळेल. आर्थिकदृष्ट्या सकारात्मकता वाढलेली असेल. सामाजिक क्षेत्रात संपर्क क्षेत्र वाढेल. शेजारधर्माशी संवाद गोडीचा ठेवा. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हाल. एकूणच सप्ताह उत्तम घडामोडींचा राहील. प्रकृती उत्तम साथ देईल. शुभ दिनांक : ४, ५ महिलांसाठी : स्वतःला सिद्ध करता येईल. (स्मिता अतुल गायकवाड)
-
वृषभ : आतुरता वाढेल दिनांक ४, ५ रोजी विचारात मन गुंतवू नका. आळस बाजूला सारून कामावरती लक्ष द्या. मिथुन राशीत प्रवेश केलेला बुध तुमच्या धनस्थानात असेल. अमावास्याही धनस्थानातूनच होत आहे. प्रत्येक गोष्टीचा ताळमेळ बसवणे चांगले जमेल. नोकरदार वर्गाला नियोजित नियमावली तयार करावी लागेल. धरसोड वृत्ती कमी होईल. व्यवसायात मागील दिवसांपेक्षा सध्याची परिस्थिती उत्तम असेल. व्यापारी वर्गाला चिंता करण्याचे कारण उरणार नाही. व्यापार-उद्योगातील परिणाम चांगला असेल. आर्थिकदृष्ट्या कामे मार्गी लावण्याची आतुरता वाढलेली असेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या शब्दाला वजन असेल. कौटुंबिक जीवनातील प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे हाताळाल. जोडीदार तुमच्या मताशी सहमत राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळल्यास प्रकृती उत्तम राहील. शुभ दिनांक : ६, ७ महिलांसाठी : श्रमाचे मोल मिळेल.
-
मिथुन : कर्तृत्व सिद्ध होईल अमावास्या तुमच्याच राशीतून होत आहे. शांत मनाने विचार केल्यास प्रत्येक गोष्ट यश मिळवून देणारी असेल. हे सूत्र लक्षात ठेवा. ७ जुलै रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. दिनांक ६, ७ रोजी चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. या दोन दिवशी मात्र आवश्यक असलेल्या गोष्टींना प्राधान्य द्या. खर्च होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहा. नोकरदार व्यक्तींचे आतापर्यंत केलेल्या कामाचे कर्तृत्व सिद्ध होईल. अनेक योजना उदयास येतील. उद्योगधंद्यात स्पर्धा असली तरी व्यावसायिक उत्पन्न चांगले राहील. कष्टाचा मोबदला चांगला मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे प्रमाण वाढलेले असेल. सामाजिकदृष्ट्या संकल्पना साकार होतील. मैत्रीच्या नात्यांमधील संवाद मनमोकळेपणाने कराल. कौटुंबिक वातावरण उत्तम असेल. आरोग्य साथ देईल. शुभ दिनांक : ४, ५ महिलांसाठी : इतरांना मदत कराल.
-
कर्क : ध्येय गाठाल अमावास्या व्ययस्थानातून होत आहे. या कालावधीमध्ये नियमांच्या चौकटीत राहा. बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. इतरांच्या वैयक्तिक भानगडीत न पडलेले चांगले. नोकरदार वर्गाने किरकोळ कुरबुरीकडे लक्ष न दिलेलेच चांगले. कामकाजाचे नियोजन व्यवस्थित केल्यास त्रास कमी राहील. व्यवसायात टप्प्याटप्प्याने चालू राहिलेली गती वाढवा. विस्कळीत झालेली घडी परत रुळावर येईल. आगामी काळासाठी केलेली तरतूद फलदायी ठरेल. आर्थिकदृष्ट्या ठरवलेले ध्येय गाठाल. सामाजिक माध्यमांचा वापर गरजेपुरताच करा. स्वार्थी मित्रांपासून लांब राहा. मुलांचे कोडकौतुक करा. पण शिस्तबद्ध वागणूक बदलू नका. कौटुंबिकदृष्ट्या केलेले बदल अंगवळणी पडण्यास उशीर लागेल. शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. प्रकृती जपा. शुभ दिनांक : ६, ७ महिलांसाठी : स्वतःचे अस्तित्व निर्माण कराल.
-
सिंह : सकारात्मक गोष्टी घडतील भाग्यस्थानातून लाभस्थनाकडे होणारे चंद्राचे भ्रमण शुभदायी ठरेल. मिथुन राशीत बुध ७ जुलै रोजी लाभस्थानात प्रवेश करेल. अमावास्या लाभस्थानातच होत आहे. नियोजनात्मक केलेल्या गोष्टींमध्ये यश मिळेल. नोकरदार वर्गाला अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडावी लागेल. अधिकारी वर्ग तुमच्या कौशल्याला दाद देईल. कोणाचाही विरोध पत्करून काम करणे तुम्हाला आवडणार नाही. व्यापारी क्षेत्रातील हालचाली वाढतील. सुरळीत व्यवहार चालू राहिल्याने ठरलेल्या वेळेत कामाची अंमलबजावणी होईल. आर्थिकदृष्ट्या नफा वाढलेला असेल. राजकीय क्षेत्रात समाधानकारक परिस्थिती निर्माण होईल. घरगुती स्तरावर सकारात्मक गोष्टी घडतील. वैवाहिक जोडीदाराशी एकनिष्ठ राहाल. आरोग्याचे स्वास्थ्य ठणठणीत राहील. शुभ दिनांक : ४, ८ महिलांसाठी : आनंदी वृत्ती राहील.
-
कन्या : कामे मार्गी लागतील दिनांक ४, ५ रोजी चंद्र अष्टमस्थानातून भ्रमण करेल. या कालावधीत महत्त्वाचे निर्णय टाळा. त्यानंतर मात्र चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून होईल. अमावास्या दशमस्थानातून होत आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर मागे राहिलेली कामे पूर्ण करा. नोकरदार वर्गाने घाई करू नका. हिशोबाचे ताळतंत्र अचूक ठेवा. व्यापारी क्षेत्रात सारखे बदलणारे नियम आता स्थिर होऊ लागतील. व्यावसायिक अंमल चांगला असेल. छोट्या-मोठ्या कलेला प्राधान्य मिळेल. उधारी वसूल होईल. आर्थिकदृष्ट्या बाकी राहिलेली कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात समजुतीच्या दिशेने वाटचाल राहील. कुटुंबातील वृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. सासुरवाडीकडील लोकांशी गैरसमज वाढू देऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. सकस व वेळेवर आहार घ्या. शुभ दिनांक : ६, ७ महिलांसाठी : सामर्थ्य बलवान होईल.
-
तूळ : स्वहित साधा ७ जुलै रोजी बुध मिथुन राशीत भाग्यस्थानात प्रवेश करेल. दिनांक ६, ७ रोजी चंद्रग्रहाची अनुकूलता वाढवण्याकडे लक्ष द्या. या कालावधीत महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. त्यानंतर भाग्यस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण इच्छेचे पाठबळ वाढवणारे असेल. नोकरदार वर्गाचा नवीन कल मार्गी लागेल. त्यासाठी ज्येष्ठांची मदत मिळेल. जुन्या कामाचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. भागीदारी व्यावसायिकांना समजुतीच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. रागावरती नियंत्रण ठेवा. मिळालेल्या उत्पन्नाचा भाग योग्य गुंतवणुकीत करा. उधार-उसनवरीचे व्यवहार करू नका. रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. आर्थिकदृष्ट्या स्वहित साधा. सार्वजनिक क्षेत्रात दोन शब्द कमी बोललेले चांगले. कौटुंबिक जबाबदारी पार पाडा. जुन्या व्याधींकडे दुर्लक्ष करू नका. शुभ दिनांक : ४, ८ महिलांसाठी : सामूहिक गोष्टींची आवड राहील.
-
वृश्चिक : क्रोधावर नियंत्रण ठेवा षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमावास्या ही अष्टमस्थानातून होत आहे. या कालावधीमध्ये उचलली जीभ टाळ्याला लावली असे करू नका. विचारपूर्वक, शांतपणाने कृती करा. स्वतङ्महून अंगावरती भांडण ओढवून घेऊ नका. प्रतिक्रिया न दिलेलीच चांगली. क्रोधावरती नियंत्रण ठेवा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वेळ वाया घालवू नका. सारखे बदलणारे अंदाज लक्षात घ्या. व्यवसायात मोठी झेप सध्या तरी नको. मोठ्या संकल्पना पूर्ण होतील. पण त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या तडजोड स्वीकारणे उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप न करणे चांगले. घरातील सदस्यांशी चर्चा करणे टाळा. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपा. शुभ दिनांक : ६, ७ महिलांसाठी : शांत राहण्याचा प्रयत्न करा.
-
धनू : वाटचाल सकारात्मक राहील अमावास्या सप्तमस्थानातून होत आहे. जोडीदाराशी वाद न करता संवाद करा. दिनांक ६, ७ रोजी सहनशीलता ठेवावी लागेल. चिडचिड करून काहीच साध्य होणार नाही. जिभेवरती नियंत्रण ठेवल्यास वाटचाल सकारात्मक राहील. नोकरदार वर्गाला अंतर्गत बाबी समजून घ्याव्या लागतील. तुमचे नियोजन पूर्ण करण्यासाठी अधिकारी व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. दूध, फळे, भाजीपाला सर्व किरकोळ व्यावसायिकांची प्रगती राहील. आडवळणी मार्ग कमी होईल. मोठी गुंतवणूक मात्र टाळा. गरजेपुरता पैसा उपलब्ध करून घेण्यात यश मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात समतोलपणा राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. मैत्रीच्या नात्यात बदलते विचार स्वीकारावे लागतील. मानसिकदृष्ट्या आध्यात्मिक गोष्टीत मन वळवा. प्रकृतीबाबतीत चढ-उतार राहतील. शुभ दिनांक : ४, ८ महिलांसाठी : गुंतागुंतीचे प्रश्न सुटू लागतील.
-
मकर : मात करू शकाल अमावास्या षष्ठस्थानातून होत आहे. या प्रहरात कायदा क्षेत्राशी संबंधित गोष्टीत हात घालू नका. दिनांक ६, ७ जुलै रोजी बुधसुद्धा षष्ठस्थानात प्रवेश करेल. नाण्याच्या एकाच बाजूचा विचार न करता दोन्ही बाजूंचा विचार केल्यास पर्यायी मार्ग मिळेल. नोकरदार वर्गाचे बौद्धिक कौशल्य प्रगतिपथावर राहील. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल. व्यावसायिक स्तरावर तांत्रिक अडचणी कमी होतील. त्यामुळे पुढील गोष्टीत मार्ग मोकळा होईल. नवीन व्यावसायिक वळण फायद्याचे ठरेल. ही कामे करत असताना आलेल्या अडचणींवर मात करू शकाल. खर्चाची तरतूद केल्यास आर्थिक ताण वाढणार नाही. घरगुती प्रश्नांचा भार हलका होईल. मनाला स्थिरता मिळाल्याने उपासनेत मन रमेल. प्रकृती साथ देईल. शुभ दिनांक : ६, ७ महिलांसाठी : शुभ घटनांचा ओघ राहील.
-
कुंभ : प्रगतीचा मार्ग मिळेल ७ जुलै रोजी बुध पंचमस्थानात मिथुन राशीत प्रवेश करेल. अमावास्या ही पंचमस्थानात होत आहे. चंद्र ग्रहाची साथ उत्तम असेल. आरामात वेळ घालवून कामे पुढे ढकलू नका. आता जी वेळ आली आहे, त्याचा उपयोग करून घ्या. नोकरदार वर्गाला बौद्धिक ताणतणाव कमी होईल. नवीन संधी प्राप्त होतील. त्यामुळे प्रगतीचा मार्ग मिळत राहील. व्यवसायात असलेली अडथळ्यांची शर्यत पार कराल. कसर भरून काढण्याचा प्रयत्न सत्कारणी लागेल. दलाली व्यवसाय करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. आर्थिकदृष्ट्या आवक वाढलेली असेल. राजकीय क्षेत्रातील धोरण अवलंबताना वरिष्ठांना दुखवू नका. मुलांसोबत करमणूक कराल. शेजारधर्माशी जेवढ्यास तेवढे राहा. वैवाहिक जोडीदाराचे सौख्य लाभेल. प्रकृती चांगली राहील. शुभ दिनांक : ५, ८ महिलांसाठी : बारकाव्याने प्रत्येक गोष्ट कराल.
-
मीन : गोष्टी जमेच्या ठरतील अमावास्या चतुर्थस्थानातून होत आहे. या प्रहरात स्थावर मालमत्तेचा प्रश्न यावर जास्त विचार करू नका. काही कालावधी गेल्यानंतर हा प्रश्न निकालात लागेल. सप्ताहात बऱ्याच गोष्टी जमेच्या ठरतील. त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. नोकरदार वर्गाने कामाचे आयोजन करताना द्विधा स्थिती होऊ देऊ नका. कामाव्यतिरिक्त नाहक गोष्टीत गुंतू नका. व्यापारी क्षेत्रात सुधारणा घडतील. काही प्रमाणात अनपेक्षित उत्पादन वाढलेले असेल. थोडी धावपळ होईल, पण श्रमाचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात बांधिलकी जपणे उत्तम जमेल. भावंडांशी मतभेद वाढू देऊ नका. मानसिकता सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करा. प्रकृतिस्वास्थ्य उत्तम राहील. शुभ दिनांक : ४, ६ महिलांसाठी : पुढील गोष्टींचे आधीच नियोजन करा.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO