-
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळीच निधन झालं. त्यांच्या निधनाने देशातल्या सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधानांपासून सर्वांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. कसे होते त्यांचे राजकारण्यांसोबतचे संबंध…पाहा ह्या फोटोंमधून!
-
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समवेत दिलीप कुमार (सौजन्यः पीटीआय)
-
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री यांना हात जोडून शुभेच्छा देताना दिलीप कुमार (सौजन्यः पीटीआय़)
-
इंदिरा गांधी यांच्यासमवेत बॉलिवूडमधले त्या काळचे गाजलेले कलाकार(सौजन्यः इंडियन एक्सप्रेस)
-
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार 1999 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी आले होते. (सौजन्यः मोहन जोशी)
-
दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांची विचारपूस केली होती. त्यावेळी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो याही उपस्थित होत्या (सौजन्यः पीटीआय)
-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दिलीप कुमार यांची भेट घेतली होती. (सौजन्यः पीटीआय)
-
२००९ मध्ये जेव्हा दिलीप कुमार यांना मलेरियाचा संसर्ग झाला होता आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी सोनिया गांधी यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. (संग्रहित छायाचित्र)
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही दिलीप कुमार यांचा स्नेह होता. दिलीप कुमार अनेकदा हट्टाने त्यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभांना जात असत, अशी आठवण शरद पवार यांनी आज सांगितली. (संग्रहित छायाचित्र)

“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल