-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून, या दौऱ्यात ते स्थानिक परिस्थितीचा आढावाही घेणार आहेत. (Express photo by Ashish Kale)
-
राज ठाकरे रविवारी पुण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पक्षाच्या पुण्यातील नवी पेठ येथील मनसेच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. (Express photo by Ashish Kale)
-
उद्घाटन झालेल्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर अनेकांना एक प्रतिकृती बुचकळ्यात पाडत होती. ती प्रतिकृती होती अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराची. (Express photo by Ashish Kale)
-
राम मंदिराच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या राजकीय भूमिका राजकीय पक्षांकडून मांडल्या जातात. मात्र, प्रथमतः एका पक्षाच्या कार्यालयात राम मंदिराची प्रतिकृती दिसली. त्यामुळे मनसेची आगामी राजकीय वाटचाल रामराज्याच्या दिशेनं तर नाही ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला. (Express photo by Ashish Kale)
-
पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर राज यांनी माध्यमांशीही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळ नामांतराच्या प्रश्नावर त्यांनी विस्तृत भाष्य केलं. 'विमानतळाची जागा बदलली म्हणून नाव बदलेल का?,' असा सवाल करत 'मी पुण्यात स्थायिक झालो तर राज मोरे होईन का? राज ठाकरेच राहणार ना', अशी भूमिका त्यांनी मांडली. (Express photo by Ashish Kale)
-
यावेळी त्यांनी राज्यातील आरक्षणांच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना सवाल केला. “राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व पक्षांचे नेते त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी मी सगळ्यांनाच मान्य आहे तर मग अडकलंय कुठे, असं विचारलं होतं. फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का? ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?,” असं राज ठाकरे म्हणाले. (Express photo by Ashish Kale)
-
राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईवरही भाष्य केलं. एकनाथ खडसे यांच्या कारवाईबद्दल विचारले असता त्यांच्या सीडीची वाट पाहतोय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. “काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही असाच वापर करण्यात आला होता. भाजपाचं सरकार आल्यानंतर ते देखील वापर करत आहेत. ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही, जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशाप्रकारे करुन चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केलेत ते मोकाट सुटले आहेत,” असे खडेबोल राज यांनी केंद्राला सुनावले. (Express photo by Ashish Kale)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”