अरुणाचल प्रदेशातील दुर्गम खेड्यातील १६ मेंढपाळ मे महिन्यात करोना लसीकरण शिबिराला येऊ शकले नव्हते. सुमारे दोन महिन्यांनंतर, आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी लुगथांग गावात लसीकरण करण्यासाठी समुद्रसपाटीपासून १४ हजार फूटांपेक्षा जास्त उंची गाठण्यासाठी नऊ तासांपेक्षा जास्त ट्रेक केले. (photo @PemaKhanduBJP) -
राज्यातील तवांग जिल्ह्यातील डोमस्टांग येथे १ मे रोजी झालेल्या लसीकरण शिबिरात मेंढपाळ पोहोचू शकले नाहीत. यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला.(photo @PemaKhanduBJP)
-
लसीकरण करण्यासाठी पोहचल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी दुसर्या दिवशी सकाळी ग्रामस्थांशी एक बैठक घेतली. जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी रिंचिन नीमा यांनी १६ मेंढपाळांना लस दिली. तसेच वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी थुतन ताशी यांनी जनावरांवरील इतर आजारांसाठी मोफत औषधे दिली.(photo @PemaKhanduBJP)
-
लुगुथांग हे तिबेटच्या सीमेजवळ आहे आणि ते टवांगपासून ३० किमी अंतरावर आहे. गावात ६५ लोकांसह १० कुटुंबे पशुपालन करणारे आहेत. (photo @PemaKhanduBJP)
-
अरुणाचलच्या अधिकाऱ्यांनी १६ मेंढपाळांना लसी देण्यासाठी ९ तासात ते १४ हजार फूट अंतर सर केले. पेमा खांडू यांनी दुर्गम समाजात लसी दिल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. (photo @PemaKhanduBJP)
-
संततधार पावसाने आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामात अडथळा आणला तरी देखील उपायुक्त सांग फुनत्सोक यांनी १६ लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्धार केला होता. (photo @PemaKhanduBJP)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा