-
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रंबन जिल्ह्यातून वाहणाऱ्या चिनाब नदीवरील बाघलियार धरणावर अशा प्रकारे तिरंग्याच्या रोषणाईने परिसर झळाळून निघाला होता! (फोटो – एएनआय स्क्रीनशॉट)
-
जम्मू-काश्मीरमधील सुप्रसिद्ध दाल लेक सरोवराच्या परिसरामध्ये देखील देशाच्या स्वातंत्र्यदिनाचं स्वागत करण्यासाठी विशेष रोषणाई करण्यात आली! (फोटो – श्रीनगर महानगर पालिका ट्विटर)
-
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी अशा प्रकारे तिरंग्याच्या तीन रंगांमधली रोषणाई केलेली पाहायला मिळत आहे. दाल लेक सरोवर परिसर देखील अशाच प्रकारे तीन रंगांमध्ये उजळून निघाला. (फोटो – श्रीनगर महानगर पालिका ट्विटर)
-
देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जम्मू येथील रेल्वे स्थानकावर देखील तीन रंगांमधील रोषणाई करण्यात आली (फोटो सतवंत सिंग रिसम ट्विटर)
-
आख्खा देश ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकामध्ये देखील अशा प्रकारची रोषणाई करत देशाच्या स्वातंत्र्याला अभिवादन करण्यात आलं आहे. (फोटो – सतवंत सिंग ट्विटर)
-
लाल किल्ला हे काश्मीरमधील आणि श्रीनगरमधील विशेष आकर्षणाचं आणि तितकंच चर्चेचं ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी रोषणाई करून काश्मीर देखील देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या स्वागतासाठी सज्ज झालं! (फोटो – श्रीनगर महानगर पालिका ट्विटर)
-
श्रीनगरमधील रस्ते देखील तिरंग्याच्या रोषणाईमध्ये न्हाऊन निघाले. (फोटो – श्रीनगर महानगर पालिका ट्विटर)
-
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाचं स्वागत करण्यासाठी काश्मीरमधील श्रीनगरमध्ये करण्यात आलेली तीन रंगांमधली अशी रोषणाई देशभक्तीच्या भावना पुन्हा जागृत करण्याचंच काम करत आहे! (फोटो – श्रीनगर महानगर पालिका ट्विटर)
-
जम्मूमधील प्रसिद्ध बाहू फोर्ट देखील देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याच्या तीन रंगांमध्ये उजळून निघाला (फोटो – सतवंत सिंग ट्विटर हँडल)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख