केरळमधील मल्लपूरममध्ये आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका खास जेवणाच्या पंगतीत हजेरी लावली. (सर्व फोटो : एएनआयवरुन) -
मल्लपूरम जिल्ह्यातील वांडूरमधील गांधी भवन स्नेहारामम म्हणजेच वृद्धाश्रमाला आज राहुल गांधीनी भेट दिली.
-
राहुल गांधी यांनी यावेळी वृद्धाश्रमातील महिलांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. वृद्धाश्रमातील महिलांसोबत त्यांनी दुपारचं जेवण केलं.
-
यावेळी राहुल गांधी यांनी दाक्षिणात्य पद्धतीने केळीच्या पानावर भोजन केलं. हे नियोजित भोजन होतं की अचानक ठरलं यासंदर्भातील माहिती समोर आली नसली तरी राहुल यांनी खास दाक्षिणात्य पदार्थ आवडीने खाल्ल्याचं पहायला मिळालं.
-
राहुल गांधीच्या भेटीच्या वेळी या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
![sant Tukaram maharaj suicide news in marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/cats_5f1be7.jpg?w=300&h=200&crop=1)
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी