-
दिवाळी.. वर्षांतला मोठा सण, ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, स्वागताची तयारी केली जाते असा सण.
-
खरं तर दिवाळी आली की परिसर आकाशकंदील, साध्या रंगीत पणत्या, लुकलुकणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या माळा, मिठाईचे बॉक्सेस, कपड्यांनी भरलेल्या दुकानांच्या शोकेस, रांगोळीचे रंग आणि गर्दीने सजून जातो.
-
दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
-
या सणानिमित्त आकाश कंदिलाची विक्री करणारे स्टॉल आता सजले आहेत.
-
आकाश कंदिलांमुळे या रस्त्याला एक वेगळंच चैतन्य प्राप्त झालंय.
-
पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या फडके चौकातल्या कंदिलाच्या दुकानाचे हे फोटो घेतलेत छायाचित्रकार पवन खेंगरे यांनी.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”