-
दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे केदारनाथ मंदिरात पोहचले आहेत.
-
पंतप्रधान मोदींनी यावेळी रुद्राभिषेक करत भक्तीभावाने बाबा केदारनाथांची पुजा केली.
-
केदारनाथाच्या मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर ते २५० कोटींच्या केदारपुरी पुनर्विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत.
-
केदारनाथच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मोदी एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा उत्तराखंडला गेले आहेत.
-
मोदी आज ज्या योजनांची घोषणा करणार आहे त्यामध्ये आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीसंदर्भातील योजनांचाही समावेश आहे.
-
मोदींच्या हस्ते आदि गुरु शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे.
-
मोदी यांच्या हस्ते केदारपुरी पुनर्विकासच्या दुसऱ्या टप्प्यामधील प्रकल्पांचे भूमिपूजन केलं जाणार असल्यांचही सांगण्यात येत आहे.
-
या योजना १५० कोटी रुपयांच्या आहेत.
-
२०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर मोदी अनेकदा केदारनाथला आले आहेत.
-
मागील वर्षी करोनामुळे ते केदारनाथला गेले नव्हते.
-
मात्र आता करोना परिस्थिती नियंत्रणामध्ये आल्यानंतर ते पुन्हा एकदा केदारनाथच्या दर्शनाला गेले आहेत.
-
मोदी केदारपुरी पुन:निर्माण प्रकल्पांमध्ये स्वत: अनेक गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत.
-
६ नोव्हेंबरपासून हिवाळ्यामुळे केदारनाथचे कपाट बंद होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
केदारनाथ मंदिराचे पुजारी बागीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदीजी महा रुद्राभिषेक करणार असून राष्ट्र कल्याणासाठी प्रार्थना करणार आहे. मोदींच्या हस्ते आदी शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे.
-
मंदिराला फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय, असंही पुजाऱ्यांनी सांगितलं.
-
(सर्व फोटो सौजन्य : BJP, ANI / ट्विटर)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”