-
मुंबई क्रूझ पार्टी प्रकरण समोर आल्यापासूनच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याचं सत्र सुरू केलं आहे.
-
मलिक यांनी या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया सहभागी असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता.
-
दाढीवाला व्यक्ती कोण? याची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी त्यावेळी केली होती. तर आता पुन्हा त्यांनी त्या व्यक्तीचे आणि समीर वानखेडेंचे जवळचे संबंध असलेल्याचा आरोप आज केला आहे. पॉर्नोग्राफी, ड्रग्ज, सेक्स रॅकेटमध्ये तो सहभागी असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्या काशिफ खानबद्दल जाणून घ्या.
-
मलिक यांनी आरोप केलेला काशिफ खान हा फॅशन टीव्हीचा भारतातला प्रमुख आहे. मलिक यांनी आरोप केला आहे की, काशिफ खानवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही वानखेडेंनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
-
मलिक यांनी काशिफ खानवर पॉर्नोग्राफी आणि सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोपही केला आहे. तर गोव्यातून ड्रग्ज, पॉर्न आणि सेक्सचा धंदा तो करत असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.
-
कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या पार्टीचं आयोजनही त्यानेच केलं होतं. त्याचे आपल्या मैत्रिणीसोबतचे या क्रूझवरचे काही फोटोही व्हायरल झाले होते.
-
नवाब मलिकांचा आरोप आहे की काशिफ खान हा तिहार जेलमध्ये तुरुंगवासात होता. एवढं सगळं असूनही मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात त्याची चौकशी करण्यात आली नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. याचं कारण त्याचे समीर वानखेडेंशी असलेले घनिष्ट संबंध हे आहे का? असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला आहे.
-
फोटो सौजन्य – काशिफ खान इन्स्टाग्राम
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच