-
एअर शो कुठलाही असू दे, अशा शो ची सुरुवात आणि शेवट हा विमानांच्या हवाई कसरीतींनीच होतो. विविध देशातली लढाऊ विमाने, हवाई कसरती करणारी खास विमाने यात सहभाग नोंदवतात.
-
पाच दिवसांच्या दुबई एअर शो सांगता करतांना भारतीय वायुदलाच्या ‘तेजस’ लढाऊ विमान आणि ‘सूर्यकिरण’ या विमानांनी सादर केलेल्या हवाई कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली.
-
सूर्यकिरण विमानांनी हवाई कसरती सादर करणाऱ्या युएईच्या Al Fursan या विमानांबरोबर प्रात्यक्षिके सादर करत डोळ्यांची पारणे फेडली.
-
सूर्यकिरण टीममधील नऊ विमाने तर Al Fursan टीममधील सात विमानांनी अत्यंत जवळून केलेले एकत्रित उड्डाण हे उपस्थितांना थक्क करुन गेले.
-
जगातील सर्वात छोटे लढाऊ विमान म्हणून ‘तेजस या विमानाची ओळख आहे, पहिल्यांदाच दुबई एअर शोच्या निमित्ताने तेजसने भारताबाहेर हवाई कसरती सादर केल्या.
-
हवेत विविध कोनातून सूर मारत, छोटे अंतर कापत एकदम वळणं घेत तेजसच्या इंजिनांनी गर्जना करत दुबईचा परिसर दणाणुन सोडला.
-
स्वदेशी बनावटीचे तेजस हे दुबई एअर शोमधील एक प्रमुख आकर्षण ठरले होते.
-
एवढंच नाही नाही तर पाकिस्तान वायुदलाच्या पायलटनांही तेजसला जवळुन बघण्याचा मोह आवरला नाही अशी चर्चा दुबई एअर शोमध्ये होती.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”