-
गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या राज्याच्या दौर्यावर असून आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले.
-
याप्रसंगी त्यांच्या हस्ते महाभिषेक आणि आरती करण्यात आली.
-
गणरायाच्या मुर्तीला मंत्रोच्चरांच्या घोषात अमित शहा यांनी अभिषेक केला.
-
यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश करोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो अशी प्रार्थना केली.
-
याचबरोबर अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, यासोबतच सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली.
-
सहकार मंत्री झाल्यापासून अमित शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.
-
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्यामुळे भाजपासाठी अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
-
आज दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने शहा यांच्या दौऱ्याची सुरूवात झाली.
-
सगळ्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होवो, अशी प्रार्थना करत गणरायला अभिषेक करण्यात आला.
-
अमित शहा यांच्या हस्ते गणरायाची विधीवत पूजा करण्यात आली
-
याप्रसंगी अथर्वशीर्षाचे आवर्तनही करण्यात आले आणि गणपतीचे अंगपूजनही करण्यात आले.
-
पूजनाच्या वेळी अमित शहा हे देखील काही मंत्रोच्चार करत होते, अशी माहिती देखील पुजाऱ्यांनी दिली.
-
गणरायाच्या विधीवत अभिषेक व पुजनानंतर मंगल आरती करण्यात आली.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला.
-
यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
-
आज सायंकाळी अमित शहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणार आहेत.
-
याशिवाय, अमित शहा हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
-
केंद्रीय गृहमंत्री गणरायाच्या दर्शनाला येणार असल्याने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात होता.
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड