-
जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई पार पडला. जयंत पाटील यांनी हा विवाह सोहळा करोनामुळे छोटेखानी पद्धतीनं करण्यात येत असल्याची माहिती फेसबुकवरुन दिली होती.
-
”आमचा मुलगा चि. राजवर्धन व चि. सौ. कां. रिया दोषी यांच्याशी आज विवाहबद्ध होत आहेत. आमच्या कुटुंबियांच्या या अत्यंत आनंदाच्या सोहळ्यात आपल्याला सामील करून घेण्याची आमची मनापासून इच्छा आहेच. कोविड निर्बंधांमुळे उपस्थितांच्या संख्येवर बंधन आले आहे. त्यामुळेच हा समारंभ छोटेखानी करण्याचा आम्ही निर्णय घेतला घ्यावा लागला”, असं पाटील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले होते.
-
या विवाह सोहळ्याला अनेक नेत्यांनी सहपरिवार भेट देऊन वधूवरांना शुभेच्छा दिल्या. जितेंद्र आव्हाडांनी नवदाम्पत्याची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत राजवर्धन यांच्या लव्हस्टोरीचा किस्सा सांगितला होता. ”जयंतरावाच्या मुलाने थेट पॅरिसच्या आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केलं. दोघांचं जुळलं, पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही.
-
या नात्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाली. पण आता, आम्ही वाळवा, इस्लामपूरपर्यंत मर्यादित राहिलो नाही. आम्ही थेट पॅरिसलाच जातो. ठिकाण इंटरनॅशनल असलं, तरी दोघेही स्थानिकच आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल,” असेही पवार यांनी सांगितलं होतं.
-
इतकंच नव्हे तर, ‘ आता आम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, कारण आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असं मिश्कील टिप्पणीही शरद पवारांनी केली होती.
-
राजवर्धन पाटील यांनी ज्या मुलीला प्रपोज केले होते, त्याच मुलीशी म्हणजे रियाशी त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. राज्यातल्या विविध नेत्यांनी या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनीही जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
-
राज्याचे सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
-
छगन भुजबळ आणि कुटुंबीय जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नासाठी आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवदाम्पत्याची भेट घेऊन त्यांना शुभाशीर्वाद दिले.
-
हर्षवर्धन पाटील, शंभूराजे देसाई आणि रामराजे नाईक निंबाळकर हे देखील जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित होते.
-
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शवत वधूवरांना आशीर्वाद दिले.
-
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही