-
करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरणाला आजपासून सुरूवात झालीय. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्याचं उद्दीष्ट डोळ्यासमोर आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
२००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिलीय. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शक्य असल्यास स्वतंत्र केंद्रे सुरू करा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी रविवारी राज्यांना केलीय. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
मुलांना फक्त कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
अठरा वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड या दोन्ही लशी देण्यात येत असल्याने लशींबाबत गोंधळ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही मंडाविया यांनी राज्यांना केलीय. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
कोव्हॅक्सिन ही सर्वात सुरक्षित लस असल्याने पालकांनी अजिबात घाबरून न जाता मुलांचे लसीकरण करावे, असा सल्ला ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी दिलाय. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
लस टोचल्यानंतर टोचलेली जागा लाल होणे, दुखणे किंवा ताप येणे हे सर्वसामान्य परिणाम दिसल्यास घाबरून जाऊ नये. अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबावे. त्यानंतर घरी जावे. मात्र, मुलांना लस देण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करू नये, असेही डॉ. आगरखेडकर यांनी स्पष्ट केले. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईत नऊ केंद्रे निश्चीत करण्यात आली आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
या केंद्रांवर महानगरपालिकेच्या शाळांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसह इतरही मुलांना मोफत लस देण्यात येणार आहे. प्रतिसाद पाहून या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग