-
शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनेक शिवसैनिक अभिवादन करतात.
-
अभिवादन करण्यासाठी अनेक ठिकाणी शिबिर तसेच अन्य उपक्रम हाती घेतले जातात.
-
मुंबईतील चेतन राऊत या कलाकाराने अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
-
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत या कलाकाराने ५०,००० मातीच्या दिव्या पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारले आहे.
-
बाळासाहेबांचे साकारलेल्या पोर्ट्रेट मध्ये ६ रंगछटा असलेले दिवे वापरले आहेत.
-
या पोर्टेटचे आकारमान ४० फूट लांब व ३० फूट रुंद आहे.
-
हे पोर्ट्रेट पूर्ण बनविण्यासाठी चेतन यांना ९ तासांचा कालावधी लागला.
-
चेतन यांच्या सोबत इतर १५ जणांनी देखील यामध्ये सहकार्य केले.
-
आय. आय. टी पवई येथील हरिश्चंद्र मैदान या ठिकाणी भव्य पोर्टेट साकारलं आहे.
-
ही पोर्टेट चित्र २२ जानेवारी ते २५ जानेवारीला नागरिकांना पाहायला मिळणार आहे.
-
चेतनने त्याच्या कलेवरील प्रेमापोटी एक दोन नव्हे तर तब्बल १४ विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत.
-
(फोटो क्रेडिट – चेतन राऊत)
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण