-
मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळा आजपासून सुरू झाल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात भरणारे ऑनलाइन वर्ग आजपासून अनेक जिल्ह्यांत प्रत्यक्ष भरले आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची संमती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने गुरुवारी त्याबाबत नियमावली जाहीर केली. (ANI फोटो)
-
शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक यांनी काय काळजी घ्यावी याबाबत त्यात सूचना देण्यात आल्या.
-
शाळा सुरू होत असल्याने मुलांनी व पालकांनी नियमांचे पालन करावे, घाबरण्याचे कारण नाही. (ANI फोटो)
-
एखादा विद्यार्थी करोनाबाधित झाल्यास संपूर्ण वर्ग बंद करण्याची सूचना आरोग्य विभागाने शिक्षण विभागाला पाठवली आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितले.
-
या उलट विद्यार्थी करोनाबाधित असल्यास त्याच्या मागील, पुढील आणि शेजारील तीन रांगांतील विद्यार्थ्यांना बाधीत विद्यार्थ्यांच्या निकट सहवासीत मानण्यात येईल, असे शिक्षण विभागाच्या नियमावलीत नमूद करण्यात आले होते. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे विद्यार्थी करोनाबाधित झाल्यास नेमके काय करावे, याबाबत सरकारच्या दोन विभागांच्या धोरणात विसंगती असल्याचे समोर आले आहे. (ANI फोटो)
-
विद्यार्थी किंवा त्याच्या घरातील कुणी आजारी असल्यास विद्यार्थ्यांला शाळेत पाठवण्यात येऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे. (ANI फोटो)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ