-
परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले होते. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
नागपुरात आंदोलक विद्यार्थ्यांनी बस फोडल्याचा आरोप आहे. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
नागपुरात विद्यार्थ्यांनी फोडलेल्या बसचा फोटो (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला.
-
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
-
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील. विद्यार्थी संख्या बरीच जास्त असल्याने ऑनलाइन परीक्षा शक्य नाही. असं राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे.
-
“काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात १०वी आणि १२वीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात. गेल्या दोन वर्षात करोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील करोना आणि परीक्षा असं दुहेरी टेन्शन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत,” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
“विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दूर जावं लागू नये, यासाठी ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सूरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही विचार करतोय, तज्ज्ञांशी चर्चा करतोय,” असं वर्ष गायकवाड यांनी सांगितलं. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
तसेच “आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावलंय. त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू. १०वी आणि १२वीच्या परीक्षा लवकर घेण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार नाहीत,” असंही त्यांनी सांगितलं. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
दरम्यान सोशल मीडिया स्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हणजेच विकास पाठक या आंदोलनामागे असून त्यानेच विद्यार्थ्यांची माथी भडकावल्याचं समोर आलं आहे.
-
‘हिंदुस्थानी भाऊ’ने आवाहन केल्यानंतर आपण रस्त्यावर उतरलो असल्याचं धारावीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. हिंदुस्थानी भाऊचाही सरकारला इशारा देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षा घेण्याचा मागणीला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली होती. तसंच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भेटीसाठी पोहोचला होता. यावेळी धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली आणि वर्षा गायकवाड यांच्या घऱासमोर आंदोलन केलं.
-
या व्हिडीओत तो गाडीत बसला असून बाहेर आंदोलन करणारे विद्यार्थी दिसत आहेत. यावेळी तो सांगत आहे की, “ही या विद्यार्थ्यांची ताकद आहे. वर्षा गायकवाड यांना लवकरात लवकर परीक्षा रद्द करावी, मुलांची शिक्षा माफ करावी यासाठी निवेदन दिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी निवदेन वर्षा गायकवाड यांच्याकडे देऊ असं आश्वासन दिलं आहे. जर इतकं केल्यानंतरही सरकारने ऐकलं नाही तर याच ताकदीने पुन्हा उतरु. हे विद्यार्थी आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. यांना न्याय मिळाला पाहिजे”.
-
दरम्यान पोलिसांनी माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
-
दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला आहे. आज विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं आहे. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
मी शिक्षण मंत्री असतो तर आज विद्यार्थ्यांवर ही वेळच आली नसती असंही हिंदुस्थानी भाऊने म्हटलं आहे. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)
-
पोलीस आता या आंदोलनप्रकरणी काय कारवाई करतात हे पहावं लागणार आहे. (एक्स्प्रेस फोटो: धनंजय खेडकर)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे