-
दादरमधील शिवाजी पार्क चौपाटी म्हणजे अनेकांचं निवातं बसण्याचं ठिकाण. समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी आलेले अनेकजण तिथे असलेल्या नारळी बागेत वेळ घालवतात. पण त्यातच आता आणखी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आला आहे. तो म्हणजे व्ह्यूइंग डेक.
-
नुकतंच चैत्यभूमी, दादर येथील व्ह्यूइंग डेकचं उद्धाटन करण्यात आलं.
-
पावसाचं पाणी समुद्रात सोडणाऱ्या वाहिनीवर मुंबई महापालिकाने हा सुंदर व्ह्यूइंग डेक उभारला आहे.
-
चैत्यभूमी जवळील हा डेक ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्यूइंग डेक’ म्हणून ओळखला जाणार आहे.
-
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे उद्धाटन पार पडलं.
-
नव्याने नूतनीकरण केलेले हे व्ह्यूइंग डेकचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.
-
सोशल मीडियावर या व्हूइंग डेकचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.
-
चैत्यभूमीचे मनमोहक दृश्य!
-
याआधी इथे असणारी जागा तिथे येणाऱ्या नागरिकांसाठी फारशी उपयोगी नव्हती. मात्र नागरिकांसाठी ओपन स्पेसचा कायापालट करण्याचा प्रयत्न म्हणून हा व्ह्यूइंग डेक उभारण्यात आला आहे. (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ