-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन सहभागी झाले होते.
-
महापौर मुरलीधर मोहोळ, उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सुनेत्रा पवार,विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर,प्र कुलगुरू डॉ.एस.एन.उमराणी आदी उपस्थित होते.
-
हा पुतळा १२०० किलो ब्राँझ धातूपासून बनलेला असून याची उंची बारा फूट आहे.
-
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर इथल्या परदेशी मूर्तीवाले यांना हा पुतळा बनवण्याचं काम देण्यात आलं होतं.
-
हे सर्व फोटो घेतलेत छायाचित्रकार आशिष काळे यांनी.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही